…म्हणून IPL च्या पहिल्याच सत्रात मुंबई इंडियन्सने मैदान गाजवलं; १५ वर्षांपासून कुणीही मोडला नाही ‘हा’ विक्रम

Mumbai Indians Record In IPL History : मुंबई इंडियन्सने २00८ मध्ये हा विक्रम करून आयपीएलमध्ये इतिहास रचला.

Mumbai Indians Records In IPL
मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये रचला इतिहास. (Image-Sachin Tendulkar)

Mumbai Indians Record In IPL History : पाचवेळा जेतेपदावर शिक्कामोर्तब करणारी मुंबई इंडियन्सची टीम आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. अनेक वेळा कठीण परिस्थितीत सावध खेळी करत मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या ट्रॉफीवर विजयाची पताका फडकावली आहे. मुंबई इंडियन्सच्या अशाच एका अनोख्या विजयाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मुंबई इंडियन्सनेच हा पराक्रम करून दाखवला आहे. आयपीएलच्या इतिहासात मागील १५ वर्षांपासून हा विक्रम मुंबई इंडियन्सच्याच नावावर कायम आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

…म्हणून मुंबई इंडियन्सचा झाला सर्वात मोठा विजय

आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात ३८ सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात मुंबईचा कर्णधार आणि भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सचिनने घेतलेला हा निर्णय गोलंदाजांनी सत्यात उतरवून दाखवला. मुंबई इंडियन्सने कोलकाताच्या आख्ख्या संघाला ६७ धावांवर गारद केलं.

नक्की वाचा – MI Vs UPW : सोफीच्या फिरकीनं कर्णधार हरमनप्रीतला गुंडाळलं; पण सिवरने यूपीच्या गोलंदाजांची केली धुलाई, पाहा Video

त्यानंतर ६८ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज सनथ जयसूर्याने १७ चेंडूत ४८ धावा कुटल्या. त्यामुळे मुंबईने पॉवर प्लेमध्ये ५.३ षटकांत ६८ धावांवर २ विकेट्स गमावत कोलकाताचा दारुण पराभव केला होता. मुंबई इंडियन्सने ८७ चेंडू राखून या सामन्यात विजय मिळवल्याची नोंद आयपीएलच्या इतिहासात करण्यात आली. १५ वर्षांपासून हा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर कायम आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 23:09 IST
Next Story
Video: WPL मध्ये इस्सी वोंगने रचला इतिहास; फलंदाजांच्या केल्या दांड्या गुल, पाहा विकेट हॅट्रिकचा व्हिडीओ
Exit mobile version