टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार झाल्यानंतर रवी शास्त्री आता ओमानमधील लेजेंड्स क्रिकेट लीगचे आयुक्त आहेत. स्पर्धेदरम्यान अनेकजण सध्याच्या भारतीय संघावर प्रश्न विचारत आहेत. विराटच्या कर्णधारपदाच्या वादावरही प्रश्न उपस्थित होत असून शास्त्रीही उत्तरे देत आहेत. अशाच काहीशा प्रश्नांना शास्रींनी तिखट आणि बेधडकपणे उत्तरे दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शास्त्री म्हणाले, ”मला सांगा की किती संघ इतके सातत्यपूर्ण खेळ करू शकले. अनेक मोठे खेळाडू विश्वचषक जिंकू शकले नाहीत. गांगुली, द्रविड, कुंबळे, लक्ष्मण, रोहित शर्मा यांनी एकही विश्वचषक जिंकला नाही. याचा अर्थ ते सगळेच वाईट खेळाडू आहेत असे नाही. तुम्ही मैदानात जाऊन तुमचा खेळ दाखवा. भारताचे केवळ दोन विश्वचषक विजेते कर्णधार आहेत. सचिन तेंडुलकरही सहाव्यांदा विश्वचषकात यशस्वी झाला. त्यामुळे विश्वचषकावरून कुणाचीही तुलना करू नये.”

हेही वाचा – VIDEO : मुंबई इंडियन्सचा क्रिकेटर झाला अल्लू अर्जुनचा दिवाना, Srivalli गाण्यावर केला भन्नाट डान्स!

काही दिवसांपूर्वी रवी शास्त्रींच्या आणखी एका विधानाने खळबळ उडवून दिली होती. त्यांनी कोणाचेही नाव न घेता म्हटले होते, की विराट कोहलीचे यश काही लोकांना पचनी पडत नाही. साहजिकच शास्त्रींचे लक्ष्य बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर होते. शास्त्रींच्या मते, ”विराट कसोटी क्रिकेटमध्ये आणखी किमान दोन वर्षे कर्णधार राहू शकला असता. या फॉरमॅटमध्ये तो सध्याचा सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार आहे. भारताला पुढील दोन वर्षात अनेक घरच्या मालिका खेळायच्या आहेत, त्यामुळे ६० सामन्यांमध्ये ४० विजयांचा विक्रम ५०-६० असा झाला असता, पण कदाचित काहींच्या हे पचनी पडणार नाही.”

विराट कोहली आता भारतीय संघात फलंदाज म्हणून भूमिका बजावत आहे. मागील वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर त्याने टी-२०चे कर्णधारपद सोडले. त्यानंतर बीसीसीआयने त्याची वनडेच्या नेतृत्वावरून हकालपट्टी केली. त्यानंतर बीसीसीआय आणि विराट कोहलीमध्ये आलबेल नसल्याचे समोर आले. अध्यक्ष सौरव गांगुली आणि विराटने कर्णधारपदावरून आणि संबंधित घटनांवरून विसंगत मते दिली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकाविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराट कसोटीच्या कर्णधारपदावरूनही पायउतार झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi shastri supports virat kohli says even sourav ganguly did not win world cup adn