“बागेश्वर बाबाने तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचं पालकत्व ज्यांच्याकडं आहे ते...” रोहित पवारांनी व्यक्त केला संताप! | Rohit Pawar criticizes Bageshwar Dhams controversial statement about Sant Tukaram Maharaj | Loksatta

“बागेश्वर बाबाने तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचं पालकत्व ज्यांच्याकडं आहे ते…” रोहित पवारांनी व्यक्त केला संताप!

भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीनेही या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत बागेश्वरबाबा

Rohit pawar new
संत तुकाराम महाराज यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची, असा दावा धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी केला आहे.  (फोटो-लोकसत्ता ग्राफीक्स टीम)

मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज आता आणखी एक नव्या वादात सापडल्याचे दिसत आहे. कारण, त्यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल एक जाहीर व्याख्यानात वादग्रस्त वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे. यावर आता सर्वचस्तरातून टीका सुरू झाली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यावर संताप व्यक्त करत, शिंदे-फडणवीस सरकारवरही निशाणा साधला आहे.

धीरेंद्र कृष्ण महाराजांचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते संत तुकाराम महाराज यांच्याविषयी बोलताना दिसत आहेत. संत तुकाराम महाराज यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची, असा दावा धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी केला आहे. 

हेही वाचा – शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? निवडणूक आयोगापुढे उद्या होणाऱ्या सुनावणीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत म्हटले की,“बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचं पालकत्व ज्यांच्याकडं आहे ते मात्र शांत आहेत. या बाबाची बडबड एकवेळ मध्यप्रदेशात खपेल पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेलं महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही. अशा माणसाला सरकारने तुकोबारायांच्याच शब्दांत उत्तर द्यावं. तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजरा!”

“जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या प्रतिमेवर चिखलफेक करायचे भाजपाचे षडयंत्र” काँग्रेस नेते सचिन सावंतांचा गंभीर आरोप!

वारकरी संप्रदायाचा नाही तर संबंध महाराष्ट्राचा अपमान –

भाजपाच्य अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनीही बागेश्वर बाबांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. “बागेश्वर धाम तथा पंडीत धीरेंद्रशास्त्री यांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांबद्दल बोलताना एक चुकीचा संदर्भ दिला आहे. ज्यातून संत तुकाराम आणि त्यांच्या धर्मपत्नींच्या प्रतिमेला ठेच पोहचली आहे. यामधून केवळ वारकरी संप्रदायाचा नाही तर संबंध महाराष्ट्राचा अपमान झाला आहे आणि म्हणून आम्ही मागणी करतो, की त्यांनी लवकरात लवकर जगद्गुरू तुकाराम महाराजांची माफी मागावी.”

Photos: धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज आणि कथावाचक जया किशोरी लग्न करणार? धीरेंद्र शास्त्री म्हणाले…

बागेश्वर बाबा नेमकं काय म्हणाले? –

“संत तुकाराम महाराष्ट्राचे एक असे महात्मा ज्यांची पत्नी त्यांना रोज काठीने मारत होती. कुणीतरी त्यांना विचारलं की तुम्ही पत्नीकडून मार खातात, तुम्हाला लाज वाटत नाही का? यावर संत तुकाराम म्हणाले की देवाची कृपा आहे की मला मारणारी पत्नी मिळाली. यावर त्या व्यक्तीने विचारले की यामध्ये देवाची कृपा काय? तर संत तुकाराम म्हणाले, जर प्रेम करणारी पत्नी मिळाली असती, तर मी देवावर प्रेम केलं नसतं, पत्नीच्याच नादात अडकलो असतो. मारणारी पत्नी मिळाली तर ती संधी तरी देतेय की, माझ्या नादात कुठे अडकलास जा प्रभू रामाच्या चरणी जा.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 16:04 IST
Next Story
धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचे संत तुकाराम महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान; म्हणाले “त्यांची पत्नी…”