VIDEO: शिंदे गटाच्या आमदाराकडून शिवीगाळ, संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले, "तिथं ते शेपट्या घालत आहेत आणि..." | Sanjay Raut answer Shinde faction MLA Sanjay Gaikwad over Offensive word | Loksatta

VIDEO: शिंदे गटाच्या आमदाराकडून शिवीगाळ, संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “तिथं ते शेपट्या घालत आहेत आणि…”

संजय राऊतांनी शिवी देणाऱ्या शिंदे गटाच्या या आमदाराला जोरदार प्रत्युत्तर दिलं. ते शनिवारी (३ डिसेंबर) शिर्डीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

VIDEO: शिंदे गटाच्या आमदाराकडून शिवीगाळ, संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “तिथं ते शेपट्या घालत आहेत आणि…”
(लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शिवसेनेच्या शिंदे गटाचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना शिवीगाळ केली. यानंतर आता संजय राऊतांनी शिवी देणाऱ्या शिंदे गटाच्या या आमदाराला जोरदार प्रत्युत्तर दिलं. “हे गद्दार आमच्यासारख्या निष्ठावंतांना शिव्या देत असतील तर चांगली गोष्ट आहे. त्यांनी रस्त्यावर येऊन शिव्या दिल्या पाहिजेत,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते शनिवारी (३ डिसेंबर) शिर्डीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “हे गद्दार आमच्यासारख्या निष्ठावंतांना शिव्या देत असतील तर चांगली गोष्ट आहे. हा आमच्या निष्ठेचा विषय आहे. त्यांना शिव्या देण्याची एवढी हौस असेल, तर महाराष्ट्रात शिव्या देण्यासारखी अनेक प्रकरणं घडत आहेत. त्यांनी रस्त्यावर येऊन शिव्या दिल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरू असताना त्यांनी किती लोकांना शिव्या दिल्या?”

“भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांना शिवी देण्याची त्यांच्यात हिंमत आहे का?”

“शिवरायांचा अपमान सुरू आहे. त्यांनी अपमान करणाऱ्यांना शिव्या द्याव्यात ना. त्यांना ही संधी मिळाली आहे, तर त्यांनी भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांना शिवी द्यावी. त्यांना शिवी देण्याची त्यांच्यात हिंमत आहे का?” असा प्रश्न संजय राऊत यांनी शिंदे गटाला विचारला.

व्हिडीओ पाहा :

“त्यांच्या शिव्या ऐकण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे”

संजय राऊत पुढे म्हणाले, “कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात घुसत आहेत. ते रोज महाराष्ट्रावर हल्ला करत आहेत. त्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंना शिवी देता का? ते त्यांना शिवी देत नाहीये, ते शिवसैनिकांना, निष्ठावंतांना शिव्या देत आहेत. त्यांनी जरूर शिव्या द्याव्यात. त्यांच्या शिव्या ऐकण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे. काय सुरू आहे हे महाराष्ट्राला कळत आहे.”

हेही वाचा : VIDEO: राऊतांना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली, शिवी देत म्हणाले, “*** तू यापुढे…”

“वेडा माणूस शिव्या देतो”

“तिथं ते शेपट्या घालत आहेत आणि इथं आम्हाला शिव्या घालत आहेत. त्यांच्या शिव्यांचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही. ते वेडे झाले आहेत. वेडा माणूस शिव्या देतो,” असं म्हणत राऊतांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना खोचक टोला लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 13:47 IST
Next Story
“राज्यात फोडाफोडीचं राजकारण”, राजापुरात राज ठाकरेंचा आरोप, म्हणाले, “मला माहित आहे कोणाकोणाला…”