आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे अभिनेते म्हणजेच मनोज बाजपेयी. अभिनय क्षेत्राच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले. त्यांची प्रत्येक भूमिका चाहत्यांनी डोक्यावर उचलून धरली. अशा या हरहुन्नरी कलाकाराला मध्यम वर्ग आयुष्य जगायला आवडतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोज बाजपेयी यांनी रिअलहिट यूट्यूब चॅनेलला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान पैशांबद्दल त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. मनोज बाजपेयी म्हणाले, “तुमच्याकडे इतके पैसे असायला हवेत ज्यात तुम्ही तुमचे वैद्यकीय खर्च आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवू शकाल. तुमचं आयुष्य तुम्हाला आदराने जगता आलं पाहिजे, जिथे तुम्हाला कोणाकडूनही उधारीने पैसे मागायची गरज भासली नाही पाहिजे. त्याशिवाय पैशांची काहीच लिमिट नाही, अंबानी हेच लिमिट आहेत. जगभरात खूप श्रीमंत लोकं आहेत आणि अभिनय क्षेत्रात राहून मी त्यांच्याइतका श्रीमंत बनू शकत नाही. तुम्हाला तुमची मर्यादा ठरवावी लागेल आणि तुमच्या लोभावर तुम्हाला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे.”

हेही वाचा… VIDEO: पापाराझींना पाहून कपिल शर्माच्या लेकीने विचारला बाबाला प्रश्न; म्हणाली, “तुम्ही बोलला होता…”

मनोज बाजपेयी पुढे म्हणाले, “जोपर्यंत तुम्हाला तुमच्या कामाचे मनासारखे पैसे मिळतात तोपर्यंत तुम्ही समाधानी असता. पण, जेव्हा तुम्ही पैशांच्या मागे लागता, पैशांचा हव्यास करता; जर तुम्ही तुमच्या कामाला प्राधान्य दिलं तर पैसे आपोआप तुमच्या मगे येतील, यावर मला खूप जास्त विश्वास आहे.”

“जोपर्यंत तुम्ही पैसे हे तुमच्या नोकरीचे उप-उत्पादन म्हणून पाहता तोपर्यंत तुम्ही शांत राहाल. पण, जर तुम्ही पैशांसाठी हताश असाल तर तुमचा प्रवास फार काळ टिकणार नाही. तुम्ही तुमच्या कामाला प्राधान्य दिल्यास पैसा आपोआप येईल, यावर माझा खूप ठाम विश्वास आहे. मुळात उप उत्पादनावर तुम्ही तडजोड करू नये”, असंही मनोज बाजपेयी म्हणाले.

हेही वाचा… “आए हाए, ओए होए… बदो बदी” या व्हायरल गाण्याची पडली ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडेला भुरळ; व्हिडीओ व्हायरल

मनोज बाजपेयी पुढे म्हणाले, “आम्ही मध्यमवर्गी आयुष्य जगतो आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु काय होतं, जेव्हा तुम्ही स्वतःसाठी नाव कमावता तेव्हा आयुष्यात आपोआप महागड्या गोष्टी यायला सुरुवात होते. पण, शेवटी आम्ही आमच्या मध्यमवर्गीय जीवनाला प्राधान्य देतो, कारण तिथेच आम्हाला शांतता मिळते. तुम्हाला लोभ आणि शांती यापैकी एक निवडायचं असतं आणि आम्ही शांतता निवडतो. माझ्याकडे एक मोठी कार आणि स्वस्त छोटी कार आहे. जेव्हाही आम्ही एकत्र बाहेर जातो किंवा मी किराणा सामान खरेदी करण्यासाठी जातो, तेव्हा मी छोटी कार चालवण्यास प्राधान्य देतो.”

दरम्यान, मनोज बाजपेयींच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा ब्लॉकबस्टर प्राइम व्हिडीओ शो ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगची सुरुवात झाली आहे. तसेच ‘भैय्याजी’ या आगामी चित्रपटात मनोज बाजपेयी झळकणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj bajpayee said he cant be reach and referred ambani dvr