अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच ‘गहराइयां’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या दीपिका या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. विशेषतः या प्रमोशनसाठी दीपिका आणि अनन्या यांनी घातलेल्या ड्रेसची सोशल मीडियावर सातत्यानं चर्चा होताना दिसत आहे. आताही असंच काहीसं घडलं आहे. नुकत्याच एका प्रमोशन इव्हेंटच्या वेळी घालेल्या ड्रेसमुळे दीपिकाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच झालेल्या एका प्रमोशन इव्हेंटसाठी दीपिकानं जॉगर्ससोबत डेनिम टॉप परिधान केला होता. पण या स्टाइलवरून तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. दीपिकाचा एक व्हिडीओ विरल भयानी यांनी त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यावर कमेंट करताना अनेक युजर्सनी दीपिकावर टीका केली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

दीपिकाच्या या व्हिडीओ कमेंट करताना एका युजरनं लिहिलं, ‘दीपिका स्विमिंग सूट बदलणं विसरून गेली आहे.’ तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘हे तर बिकिनीचं संपूर्ण व्हर्जन आहे’ आणखी एका युजरनं दीपिकाच्या व्हिडीओवर कमेंट करताना, ‘स्विमिंग कॉस्ट्यूमसोबत जॉगर्स घातले का?’ असा प्रश्न विचारला आहे. याशिवाय काही युजर्सनी दीपिकाची तुलना उर्फी जावेदसोबत करत या ड्रेसची निवड चुकीची असल्याचं म्हटलं आहे. पण यासोबतच काही युजर्सनी मात्र काय घालवं हा तिचा निर्णय असू शकतो असं म्हणत दीपिकाला पाठिंबा दिला आहे.  

दरम्यान शकुन बत्रा दिग्दर्शित ‘गहराइयां’ चित्रपटात अनन्या पांडे, दीपिका पदुकोण, धैर्य कारव आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ११ फेब्रुवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. चित्रपटात आधुनिक नातेसंबंधांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone trolled for wearing dress at gehraiyaan promotion mrj