टेलिव्हिजनवरील सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसलेला सेलिब्रिटी फॅशन डिझायनर रोहित वर्मा अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. ‘बिग बॉस ३’ मध्येही रोहितने त्याच्या आयुष्यातील काही धक्कादायक गुपितं उघड केली होती. बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्यांशी त्याचे नाते असल्याचे रोहितने यापूर्वीच मान्य केले होतं. आता नुकतेच रोहितने पुन्हा एकदा त्याच्या आयुष्याशी संबंधित वादांवर भाष्य केले आहे. एका मुलाखतीत रोहितने बॉलिवूड इंडस्ट्रीतील कास्टिंग काउचपासून बालपणी झालेल्या लैंगिक शोषणापर्यंत अनेक खुलासे केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत रोहितने रोहितच्या आयुष्यातील याआधी कधीही न ऐकलेली गुपितं उघड केली. बॉलिवूडचा हा सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहितला, “पुरुष कलाकार ते समलिंगी आहेत की बायसेक्शुअल आहेत याबद्दल उघडपणे बोलतात का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना रोहित म्हणाला, ‘मला विश्वास आहे की बॉलिवूडमध्ये सगळेच बायसेक्शुअल आहेत. कोणीही साधं सरळ नाही. काही लोक त्याबद्दल उघडपणे बोलतात, काहींना बोलता येत नाही. अनेक अभिनेत्याशी माझं नातं होतं, हे मी नाकारणार नाही. काही लोक हे लपूनछपून करतात. पण, उघडपणे बोलण्याची मला मोठी किंमत मोजावी लागली आहे.”
आणखी वाचा- लांब केस, डोळ्यावर चष्मा अन्… सलमानच्या ‘या’ बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा टीझर चर्चेत

या मुलाखतीत एक किस्सा शेअर करताना रोहित म्हणाला, ‘मी खूप अगोदर एका अभिनेत्याशी रिलेशनशिपमध्ये होतो, आम्ही लिव्ह-इनमध्ये राहायचो. पण नंतर अचानक त्या अभिनेत्याला जास्त काम मिळू लागलं, मग तो सामान घेऊन निघून जाऊ लागला. जेव्हा मी त्याला म्हटलं, “तुला भावना नाहीत का? मी तर तुझी अंतर्वस्त्रही धुतली आहेत.” त्यावर तो म्हणाला, “त्यात काय झालं, मी तुला बेडवर चांगला वेळ दिला आहे.” तसेच रोहितने या मुलाखतीत त्याने अनेक कलाकारांसाठी करावचौथचे व्रत देखील ठेवल्याची कबुली दिली.

या मुलाखतीत रोहित वर्माने त्याच्यावर लागलेल्या कास्टिंग काउचच्या आरोपांबद्दलही बोलला. रोहित म्हणाला, ‘साहिल माझा मित्र होता. तो माझ्या घरी खूप वेळा यायचा आणि मला ते खूप आवडायचे. मग एक दिवस मला कळले की साहिल चौधरीने माझ्यावर कास्टिंग काउचचा आरोप केला आहे. हे ऐकून माझी आई खूप रडली, त्यानंतर मी त्याचे चॅट सोशल मीडियावर टाकले आणि मानहानीचा खटला दाखल केला. मी कधीही कोणावरही जबरदस्ती केली नाही आणि जर मी त्याच्याशी असं वागलो असतो तर त्याने माझ्या कानशिलात लगावली नसती का?’

आणखी वाचा- “तू आता बॉलिवूड वाइफ नाहीस…” सोहेल खानपासून घटस्फोट घेतल्याने सीमा सजदेह ट्रोल

याशिवाय याच मुलाखतीत आपल्या बालपणाबद्दल बोलताना रोहित म्हणाला, ‘मी एका चांगल्या कुटुंबात लहानाचा मोठा झालो आहे. पण माझ्या कुटुंबातील सदस्य खूप जुन्या विचारांचे आहेत. माझा जन्म एका चांगल्या कुटुंबात झाला असला तरी, माझ्या लहानपणी माझ्या काकांनी माझे लैंगिक शोषण केले. वयाच्या आठव्या वर्षी माझ्याच काकांनी माझ्यावर बलात्कार केला होता. ते मला साडी नेसायला लावायचे, अंगावर गरम मेण टाकायचे आणि आणखी अपमानास्पद कृत्ये करायचे. हे सर्व तीन-चार वर्षे चालले. भीतीपोटी मी माझ्या आई-वडिलांना हे कधीच सांगितले नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Designer rohit verma shocking reveal that everyone is bisexual in bollywood mrj