“कोर्टात भेटू…” म्हणत रितेश देशमुखने करीनाला पाठवली नोटीस, पाहा नेमकं काय घडलं

रितेश देशमुख आणि करीना कपूर खान यांचा व्हिडीओ चर्चेत…

“कोर्टात भेटू…” म्हणत रितेश देशमुखने करीनाला पाठवली नोटीस, पाहा नेमकं काय घडलं
सोशल मीडियावर रितेश आणि करीना यांच्या या व्हिडीओची बरीच चर्चा आहे.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो आणि त्यामुळेच तो अनेकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषयही ठरताना दिसतो. अनेकदा तो मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो जे व्हायरल होताना दिसतात. आताही त्याचा करीना कपूर खानसोबतचा एक व्हिडीओ बराच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो करीना कपूर खानला कोर्टात भेटायला सांगत असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर रितेश आणि करीना यांच्या या व्हिडीओची बरीच चर्चा आहे.

रितेश देशमुख त्याच्या ‘केस तो बनता है’ या कॉमेडी शोमुळे खूप चर्चेत आहे ज्यामध्ये सेलिब्रिटींना कोर्टरूममध्ये त्यांच्यावरील आरोपांना उत्तर द्यायचे असते. या शोमध्ये लवकरच अभिनेत्री करीना कपूर हजेरी लावणार आहे. नुकताच या शोचा प्रोमो प्रदर्शित झाला. हा मजेदार प्रोमो रितेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात तो करीनाच्या हातात कोर्टाची नोटीस देताना दिसतोय.
आणखी वाचा-“प्रेम नसताना सेक्स करणं…” शरीरसंबंधांबाबत सिद्धार्थ मल्होत्राचं वक्तव्य चर्चेत

या व्हिडीओमध्ये करीना कपूर पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत असून ती तिच्या जवळून जाणार्‍या एका व्यक्तीला पाहून, ‘कोण आहे तो ज्याने माझ्याकडे मागे वळून पाहिले नाही?’ असं म्हणताना दिसतेय. यावर रितेश देशमुख म्हणतो, ‘तो कायदा आहे.’ रितेशच्या उत्तरावर, ‘त्याने मला नोटीस नाही केलं’ असं करीना म्हणताना दिसते. यानंतर रितेश देशमुख, “तो नोटीस करत नाही, तो नाटीस पाठवतो. कोर्टात भेटू..” असं म्हणतो आणि करीनाच्या हातात नोटीस देतो. हे पाहिल्यावर करीनालाही धक्का बसतो. करीना कपूर आणि रितेश देशमुखचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

आणखी वाचा- रितेश देशमुखने केला सेटवरील सामान चोरल्याचा आरोप, ऐश्वर्याचे नाव घेत अभिषेक म्हणाला…

दरम्यान रितेश देशमुखच्या नव्या कॉमेडी शोबद्दल बोलायचं तर अमेझॉन मिनी टीव्हीवर येणारा शो ‘केस तो बनता है’ देशातील पहिला कोर्ट कॉमेडी शो आहे, ज्यामध्ये रितेश सेलिब्रिटींवर आरोप करताना दिसत आहे. या शोमध्ये वरुण शर्मा सेलिब्रिटींचा बचाव करताना दिसत आहे आणि कुशा कपिला जजच्या भूमिकेत आहे. करण जोहर, करीना कपूर, अनिल कपूर, रोहित शेट्टी, वरुण धवनपासून ते सारा अली खानपर्यंत अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये सहभागी होणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“आम्ही एकत्र फिरलो तर…” राघव जुयालला डेट करण्याच्या चर्चांवर शहनाझ गिलचे स्पष्टीकरण
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी