“आता पाणी डोक्यावरून जातंय…” ‘बॉयकॉट’ ट्रेंडवर विजय वर्माची संतप्त प्रतिक्रिया

सध्या बॉयकॉट ट्रेंडची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.

“आता पाणी डोक्यावरून जातंय…” ‘बॉयकॉट’ ट्रेंडवर विजय वर्माची संतप्त प्रतिक्रिया

मागच्या काही काळापासून प्रदर्शित झालेले बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवण्यात सातत्याने अपयशी ठरल्याचं दिसत आहे. आमिर खान असो वा अक्षय कुमार मोठ्या स्टार्सचे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकलेले नाहीत. ‘लाल सिंग चड्ढा’, ‘रक्षा बंधन’ या चित्रपटांनंतर आता शाहरुखचा ‘पठान’ आणि हृतिकचा ‘विक्रम वेधा’ या चित्रपटांवरही बहिष्कार टाकण्याचं आवाहन सोशल मीडियावर होताना दिसत आहे. यावर काही दिवसांपूर्वीच यावर अभिनेता अर्जुन कपूरने आपलं मत मांडलं होतं. त्यानंतर आता ‘डार्लिंग्ज’ फेम अभिनेता विजय वर्मानेही प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता विजय वर्मा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या आलिया भट्टच्या ‘डार्लिंग्ज’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीही ‘बॉयकॉट डार्लिंग्ज’ असा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या सर्वच गोष्टींवर आता विजय वर्माने प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना विजय वर्मा म्हणाला, “मला हे बॉयकॉट कल्चर खूपच भीतीदायक वाटतं. मी याचं उत्तर शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्यात मला अपयश आलं.”
आणखी वाचा- “कोर्टात भेटू…” म्हणत रितेश देशमुखने करीनाला पाठवली नोटीस, पाहा नेमकं काय घडलं

इंडिया टुडेशी बोलताना विजय वर्मा म्हणाला, “हे सर्व तुम्हाला घाबरवणारं आहे. पण आता हे जरा अति होत आहे. मला वाटतं कुणी १० वर्षांपूर्वी जे काही बोललेत ते कदाचित आक्षेपार्ह असेलही आणि त्यावेळी त्यावर लोकांनी प्रतिक्रियाही दिला असेल. त्यावेळी हे सर्व चालून गेलं असेल पण आता हे अजून काही काळ सहन करणं अशक्य आहे. तुम्ही म्हणाल म्हणून एखादी गोष्ट अशी अचानक बंद किंवा बहिष्कृत केली जाऊ शकत नाही.”

आणखी वाचा- तू किंग खान नाहीस म्हणणाऱ्यांना अभिनेता विजय वर्माने दिले सडेतोड उत्तर, म्हणाला, “आता शाहरुखनेच..”

विजय वर्माच्या कामाबद्दल बोलायचं तर काही दिवसांपूर्वीच तो आलिया भट्टच्या ‘डार्लिंग्ज’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट ५ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आगामी काळात विजय वर्मा Devotion of Suspect X च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासह करीना कपूर खान आणि जयदीप अहलावत यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. याशिवाय त्याने अलिकडेच ‘मिर्जापूर ३’च्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘विक्रम’नंतर कमल हासन पुन्हा एकदा ऍक्शन अवतारात : दिसणार ‘या’ चित्रपटाच्या सीक्वलमध्ये
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी