लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: धारावीतील सात मजली शमा इमारतीला रविवारी लागलेल्या आगीत ३३ जण जखमी झाले. जखमींना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सोमवारी सकाळी उपचारानंतर सहा जणांना घरी सोडण्यात आले. सध्या २७ जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असली तरी ९ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

शमा इमारतीच्या पाचव्या मजल्यावर रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली होती. या आगीमुळे इमारतीमध्ये पसरलेल्या धुरामुळे अनेकांना त्रास झाला. अनेक रहिवाशांचे श्वास गुदमरल्याने त्यांना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री ११ वाजेपर्यंत ३३ जणांना दाखल करण्यात आले. त्यात धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झालेल्यांची संख्या अधिक आहे.

आणखी वाचा-मुंबईत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, नवी मुंबईत जोरदार वारे

रुग्णालयात दाखल रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात आले. यातील बरे वाटलेल्या रुग्णांना सोमवारी सकाळी घरी सोडण्यात आले. दाखल ३३ रुग्णांपैकी ६ रुग्णांना सोमवारी सकाळी घरी सोडण्यात आले. त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे तर ९ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांना प्राणवायू देण्यात येत आहे. उर्वरित १८ रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णांच्या प्रकृतीनुसार त्यांना घरी सोडण्यात येईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharavi fire disaster leaves six people at home 27 people are undergoing treatment mumbai print news mrj