लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईः महसुल गुप्तवार्ता संचलनालयाने(डीआरआयने) मुंबई विमानतळावर गुरूवारी केलेल्या कारवाईत कोकेनसह परदेशी महिलेला अटक केली. आरोपी महिलेकडून सुमारे १५ किलो कोकेन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत १५ कोटी रुपये आहे.

आणखी वाचा-संपूर्ण वर्षभर प्रशासकांची राजवट… निवडणूकीच्या प्रतिक्षेत सरत्या वर्षाला निरोप

कॅरेन वेनजेरू म्बीरे म्वावरा(३०) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ती केनिया देशाची नागरिक आहे. नायरोबीवरून मुंबईत येणाऱ्या एका महिला प्रवाशाकडे कोकेन असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुरूवारी मुंबई विमानतळावर सापळा रचून कॅरेनला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडील बॅगेत १४ किलो ९०० ग्रॅम कोकेन सापडले असून त्याची किंमत १४ कोटी ९० लाख रुपये आहे. दोन काळ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये कोकेन लपवण्यात आले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foreign woman arrested with cocaine worth 15 crores mumbai print news mrj