मुंबई : अकरावीची दुसरी प्रवेश यादी जाहीर ; ६९ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

१५ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

मुंबई : अकरावीची दुसरी प्रवेश यादी जाहीर ; ६९ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश
(संग्रहित छायाचित्र)

अकरावी प्रवेशाची दुसरी यादी जाहीर झाली असून मुंबई महानगरातील ६९ हजार ६९१ विद्यार्थ्यांना या फेरीत महाविद्यालय मिळाले आहे. त्यातील १५ हजार १२१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.

विद्यार्थ्यांनी दिलेले महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम, महाविद्यालयातील पहिल्या फेरीनंतर रिक्त असलेल्या जागा याची सांगड घालून अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची दुसरी प्रवेश यादी शिक्षण विभागाने जाहीर केली. या फेरीसाठी १लाख ६५ हजार ७११ जागा होत्या. त्यासाठी १लाख ६२ हजार ५०७ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील ६९ हजार ६९१ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले.

मात्र या फेरीत प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी तुलनेने कमी आहेत. त्यामुळे महाविद्यालय मिळूनही प्रवेश निश्चित करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही कमी असण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai 11th second admission list released 69 thousand students admitted mumbai print news amy

Next Story
मुंबई : पेट्रोलमन मोतीराम लोभी यांच्या सतर्कतेमुळे टळला अपघात; खंडाळा घाटातील घटना
फोटो गॅलरी