मुंबईमध्ये दुचाकीस्वार आणि मागे बसलेल्या व्यक्तीसाठीही हेल्मेटसक्ती करण्यात आलेली आहे. १५ दिवसांमध्ये नियमांचे पालन न केल्यास पोलीस सक्तीची कारवाई करणार आहेत. वाहतूक नियम न पाळणाऱ्यांना आता वाहतूक पोलिसांनी इशारा दिला आहे. त्यामुळे आता दुचाकीस्वारांसह मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणे सक्तीचे होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोटर सायकवरून प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी हेल्मेट वापरणे बंधनकारक असणार आहे. नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. येत्या १५ दिवसानंतर ही अंमलबजावणी होणार असून यासंबंधी पोलिसांनी परिपत्रक जारी केलं आहे. हेल्मेट न वापरल्यास ५०० रुपये दंड आणि ३ महिने लायसन्स निलंबित करण्याची तरतूद देखील यामध्ये आहे.

या संदर्भात मुंबई पोलिसांनी एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. “मुंबई शहरामध्ये अनेक मोटार सायकलस्वार हे विना हेल्मेट मोटारसायकल चालवतात. तसेच मागे बसलेली व्यक्तीसुद्धा हेल्मेटचा वापर करत नाही. वास्तविक पाहता मोटार सायकलस्वार यांनी त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट वापरणे हे मोटार वाहन कायदा १९८८ कलम १२९ सह १९४(ड) अन्वये बंधनकारक आहे. हेल्मेटशिवाय मोटार सायकल चालवल्यास कायद्यामध्ये ५०० रुपये दंड तसेच तीन महिन्यासांटी लायसन्स निलंबीत करण्याची तरतूद आहे. सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, मोटार सायकलस्वार आणि त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट वापरावे. अन्यथा १५ दिवसानंतर अशा मोटार सायकलस्वारांच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीवरसुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” असे मुंबई वाहतूक पोलिसांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai person sitting on the back of a two wheeler is forced to wear a helmet abn
First published on: 25-05-2022 at 13:10 IST