मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस; पुढच्या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळत असून मुंबईतील विविध ठिकाणचे सखलभाग जलमय झाले आहेत.

rain
(संग्रहीत छायाचित्र)

मुंबईमध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आतापर्यंत मुंबईत १५० मिली लिटर पाऊस पडला आहे. मुंबई हवामान खात्याकडून पुढील चार दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुढचे चार दिवस मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पंपाद्वारे पाणी काढण्याचे काम

मुंबई महानगरपालिका पूर्णपणे सज्ज असून ज्या ज्या सखोल भागांमध्ये पाणी साचलं आहे. या भागांमधील पाणी पंपाद्वारे काढण्याचे काम महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. तसेच महापालिकेच्या डिझास्टर कंट्रोल रुममधून मुंबईच्या विविध भागातील परिस्थिती हाताळली जात आहे. त्याचा आढावा देखील घेण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त यांच्या मार्गदर्शनात डिझास्टर मॅनेजमेंट काम करत असल्याचे हापालिका डिझास्टर मॅनेजमेंटचे महेश नार्वेकर यांनी सांगितले आहे.

एनडीआरएफसह इतर यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश

संपूर्ण राज्यभरात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. कोकण किनारपट्टीवर धुवाँधार पाऊस कोसळत आहे. मध्य प्रदेशाच्या मध्य भागावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. गुजरात तटपासून ते महाराष्ट्र तटपर्यंत पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. यामुळे पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक जयंता सरकार यांनी व्यक्त केला. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत मिळावी यासाठी एनडीआरएफ, सीडीआरएफ, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाला सज्ज राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Orange alert issued to mumbai for next four days due to heavy rain dpj

Next Story
मुंबईत खड्ड्यांचा प्रश्न, तुम्ही महापालिकेत लक्ष घालणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी