12 cheetahs coming again in February preparations for underway Nagpur Rgc 76 ysh 95 | Loksatta

नागपूर : फेब्रुवारीत येणार पुन्हा १२ चित्ते, सामंजस्य करारावर स्वाक्षरी, स्वागताची तयारी सुरू

फेब्रुवारी महिन्यात दक्षिण अफ्रिकेतून १२ चित्ते भारतात आणण्यासंदर्भात या दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली आहे.

cheetah
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

नागपूर : फेब्रुवारी महिन्यात दक्षिण अफ्रिकेतून १२ चित्ते भारतात आणण्यासंदर्भात या दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली आहे. सप्टेंबर महिन्यात नामिबिया येथून भारतात मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आठ चित्ते आणले. त्यानंतर या प्रकल्पाअंतर्गत आणखी १२ चित्ते आणण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीच लोकसत्ताने भारतात पुन्हा १२ चित्ते आणणार अशा आशयाची बातमी प्रकाशित केली होती.

जगभरात सुमारे सात हजार चित्ते असून त्यातील बहूतांश चित्ते दक्षिण अफ्रिका, नामिबिया व बोत्सवाना येथे आहेत. त्यातही नामिबिया येथे जगभरातील सर्वाधिक चित्त्यांची संख्या आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात नामिबिया येथून पाच मादी व तीन नर चित्ते भारतात अणले. दोन्ही देशाील सामंजस्य कराराअंतर्गत १२ चित्त्यांची पहिली तुकडी फेब्रुवारी महिन्यात दक्षिण अफ्रिकेतून भारतात येण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात हे १२ चित्ते आणल्यानंतर पुढे आणखी चित्ते भारतात स्थानांतरित करण्याची योजना आहे. सामंजस्य कराराच्या अटीचे दर पाच वर्षांनी पुनरावलोकन केले जाईल, असे केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा >>> उपराजधानीतील वनखात्याचे मुख्यालय राजधानीत पळवण्याचा घाट; प्रस्ताव तयार, मंत्रालयात हालचाली सुरू

चित्ता संवर्धनाला चालना देणे हा या सामंजस्य करारातील प्रमुख मुद्दा आहे. त्यासाठी तज्ज्ञांची देवाणघेवाण केली जाईल. येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत सात नर आणि पाच मादी चित्ते मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात पोहोचण्याची शक्यता मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेने भारतात चित्त्यांच्या पूनर्परिचयासाठी कृती आराखडा तयार केलेल्या दक्षिण अफ्रिका, नामिबिया आणि इतर अफ्रिकन देशातून भारतात चित्ता आयात केला जाईल. भारतात आणण्यात येणाऱ्या दक्षिण अफ्रिकेतील नऊ चित्त्यांना लिम्पोपो प्रांतातील डॉ. अँड फ्रेजर यांच्याद्वारे चालवण्यात येणाऱ्या रुईबर्ग पशुवैद्यकीय सेवांमध्ये आणि इतर तीन चित्त्यांना क्वाझुलु-नताल प्रांतातील फिंडा गेम रिझर्वमध्ये अलग ठेवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 17:31 IST
Next Story
नागपूर : एकाही भाजपशासित राज्यात ‘जुनी पेन्शन योजना’ का नाही, भाकपचा सवाल