नागपूर : गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रेमीयुगुल रस्त्यावरच अश्लील चाळे करून प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. शहरात आणखी एक प्रेमी युगुल कार उभी करून रस्त्यावरच दोघेही नग्न अवस्थेत अश्लील चाळे करताना आढळून आले. ही घटना शनिवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास बजाजनगर चौक ते लक्ष्मीनगर चौका दरम्यान घडली असून त्याची चित्रफित समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे.

या प्रकरणाची अद्याप पोलिसांनी दखल घेतली नाही, हे विशेष. नागपुरातील बजाजनगर चौक ते लक्ष्मीनगर चौकादरम्यान असलेल्या रस्त्यावर मध्यरात्री एक वाजता आलिशान कार थांबली. काही वेळ झाल्यानंतर अचानक एक तरुण नग्नावस्थेत कारच्या बाहेर आला. त्याने कारमधील तरुणीला शिवीगाळ केली. दोघांचा वाद झाला. तो नग्नावस्थेत रस्त्यावरून चालायला लागला. यादरम्यान, ती तरुणीसुद्धा कारमधून नग्नावस्थेतच बाहेर पडली. प्रियकराच्या मागे मागे चालायला लागली. ती त्याला माफी मागत होती आणि कारमध्ये बसायला सांगत होती. मात्र, तो तरुण कारमध्ये बसायला तयार नव्हता. त्यामुळे ती तरुणी त्याला वारंवार विनंती करून कारकडे खेचण्याचा प्रयत्न करीत होती. दोघांचा रस्त्यावरच वाद झाला. मात्र, वाद विकोपास गेल्यामुळे तो तरुण रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झोपडीकडे जायला लागला. यादरम्यान, एका दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांना हा प्रकार दिसला. त्यांनी दोघांचीही भ्रमणध्वनीने चित्रफित बनवली. दोघांचेही अश्लील चाळे करताना छायाचित्र काढले. ती चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित केली. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळपर्यंत ती चित्रफित अनेकांपर्यंत पोहचली.

हेही वाचा : नवनीत राणा म्‍हणतात, “मी माझ्या परीक्षेत नापास, पण…”

यापूर्वी अशा दोन घटनांच्या चित्रफिती प्रसारित

यापूर्वी रस्त्यावर अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगुलांवर सदर आणि सीताबर्डी पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पहिल्या घटनेत, एक सीए झालेला तरुण आणि अभियंता तरुणी एका चालत्या कारमध्ये स्टेअरिंगवर बसून शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होते. तरुणीने मद्यप्राशन केले होते. त्या प्रेमी युगुलावर सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दुसऱ्या घटनेत, सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका प्रेमविराने प्रेयसीला दुचाकीच्या समोर बसवले. दुचाकी चालविताना ती तरुणी प्रियकराशी अश्लील चाळे करीत होती. दोघेही सार्वजनिक रस्त्यावर बराच वेळ अश्लील चाळे करीत होते. या दोन्ही प्रकरणात गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा : बुलढाणा : चालकाचे नियंत्रण सुटले अन् भरवेगातील काळी पिवळी थेट खड्ड्यात पडली, दहा प्रवासी गंभीर…

पोलिसांनी घ्यावी दखल

गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे करण्याचे प्रमाण वाढले आहेत. अनेक रस्त्यावर पोलिसांची गस्त नसते. असे रस्ते बघून रात्रीच्या वेळी प्रेमी युगुल रस्त्याच्या कडेला कार थांबवून अश्लील चाळे करीत असतात. रस्त्यावर पोलीस दिसत नसल्यामुळेच प्रेमी युगुलांची रस्त्यावर असे कृत्य करण्याची हिम्मत वाढली आहे. पोलीस आयुक्तांनी अशा प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.