वर्धा : बहुप्रतिक्षित शिक्षक भरती प्रक्रिया एक सप्टेंबरपासून सुरू झाली असून, गत दहा दिवसांत केवळ एक लाख पात्र उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या नोंदणीसाठी २ लाख १६ हजार ४४३ उमेदवार पात्र असल्याची माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१५ सप्टेंबरपर्यंतच नोंदणी मुदत आहे. राज्यभरात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे भरती केल्या जाणार आहे. मात्र प्रतिसाद उत्साहवर्धक नसल्याचे चित्र आहे. अद्याप दीड लाखावर उमेदवार नोंदणी बाहेर आहेत. पण त्यापैकी ५० ते ६० हजारच नोंदणी करू शकतात. कारण अनेकांना खूप कमी गुण आहेत. ते इकडे फिरकणार नाहीत.

हेही वाचा – नागपूर : ‘घेऊन येतो आहे साहेबांचा संदेश’, काय आहे उपक्रम वाचा…

हेही वाचा – नागपूर: खाद्य तेलाच्या कारखान्यावर पोलिसांचा ‘नाट्यपूर्ण’ छापा, के आहे प्रकरण जाणून घ्या…

पात्रता परीक्षेत जवळपास नऊ हजारांना प्रतिबंधित करण्यात आले आहे. ही पदे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुलाखतीशिवाय तर खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह अश्या दोन्ही प्रकारे भरल्या जाणार आहेत. आता नोंदणीसाठी केवळ तीन दिवस उरले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Low response to teacher recruitment why pmd 64 ssb
First published on: 12-09-2023 at 09:50 IST