ॲग्रोव्हिजनचे आयोजक अन् लाभार्थीही, खुद्द गडकरींनीच भाषणात सांगितले फायदे | Nitin Gadkari said Currently there is no other profitable farming field like sugarcane | Loksatta

गडकरी म्हणतात सध्या ऊसा सारखी फायद्याची शेती दुसरी नाही…

ऊसाचे एकरी उत्पादन कसे वाढले व ही शेती कशी फायदेशीर आहे हे खुद्द त्यांनीच ही बाब प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात जाहीरपणे सांगितली.

गडकरी म्हणतात सध्या ऊसा सारखी फायद्याची शेती दुसरी नाही…
गडकरी म्हणतात सध्या ऊसा सारखी फायद्याची शेती दुसरी नाही…

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागपुरात मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन आयोजित केले जाते. यात कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान व कृषी विज्ञान यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. विदर्भातील अनेक शेतक-यांनी याचा वापर करून कृषी उत्पादनात वाढ केली. गडकरी त्याला अपवाद नाहीत. ऊसाचे एकरी उत्पादन कसे वाढले व ही शेती कशी फायदेशीर आहे हे खुद्द त्यांनीच ही बाब प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात जाहीरपणे सांगितली. विशेष ॲग्रोव्हिजनचे आयोजक गडकरी हेच आहे.

हेही वाचा… …आणखी एक बळी जाण्याच्या मार्गावर; आठवडाभरपूर्वीच “त्या” जोडप्याचाही झाला होता मृत्यू

हेही वाचा… नक्षलग्रस्त गडचिरोलीत भांडवलदारांचे राज्य : जयंत पाटील

काय म्हणाले गडकरी

ॲग्रोव्हिजनमध्ये दिल्या जाणाऱ्या माहितीचा मी माझ्या शेतात अवलंब केला. त्याचा फायदा झाला. ऊसाचे एकरी उत्पादन ७८ टन इतक्या मोठय़ा प्रमाणात वाढले. सध्या ऊसासारखी फायद्याची शेती दुसरी नाही. असे गडकरी म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 14:27 IST
Next Story
…आणखी एक बळी जाण्याच्या मार्गावर; आठवडाभरपूर्वीच “त्या” जोडप्याचाही झाला होता मृत्यू