नागपूर : भारतीय लष्करात महिलांचा टक्का वाढू लागला आहे. नागपूरच्या आणखी एका युवतीने लष्करात वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. सिद्धी हेमंत दुबे हिची भारतीय नौदलात वैमानिक म्हणून निवड झाली आहे. सिद्धी नागपूरच्या रामदेवबाबा अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. तिची दोनदा भारतीय सैन्यदलात निवड झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण तिने ‘इंडियन नेव्ही एव्हीएशन’ला प्राधान्य दिले. २०२० साली नागपूरच्या अंतरा मेहता यांची भारतीय हवाई दलात ‘फायटर पायलट’ (लढाऊ वैमानिक) म्हणून निवड झाली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selection of siddhi hemant dubey as pilot in indian navy rbt 74 amy