नाशिक – शहरातील उपेंद्र नगरातील रुद्र द प्रॅक्टिकल स्कुल या शाळेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षाच्या विद्यार्थिनीचा मंगळवारी सकाळी चक्कर आल्याने शाळेतच मृत्यू झाला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

उंटवाडी परिसरातील जगताप नगर येथील दिव्या त्रिपाठी ही मंगळवारी सकाळी शाळेत गेली होती. बरे वाटत नसल्याने आसनस्थळी ती डोके ठेवून बसली. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास चक्कर आल्याने बेशुध्द होऊन ती खाली पडली. तब्येतीविषयी तिच्या पालकांना तातडीने कळविण्यात आले. वडील प्रतेश त्रिपाठी आणि शिक्षिका चैताली चंद्रात्रे यांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6th class student died due to dizziness in nashik amy
First published on: 25-06-2024 at 14:50 IST