जळगाव – नोव्हेंबर २०२२ पासून शहरासह जिल्ह्यातील १९ सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली असून, नुकतेच दोन सराईत गुन्हेगारांना दोन वर्षे स्थानबद्ध करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव तालुक्यात २०२० पासून अवैधरीत्या हातभट्टीची दारू तयार करून त्याची विक्री करण्याबाबतचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे वारंवार करणारा जिभाऊ गायकवाड (३४, रा. दापोरा, ता. जळगाव), तसेच २०१५ पासून यावल, चोपडा व जळगाव या तालुक्यांतील तापी नदीपात्रातून विनापरवाना अवैधरीत्या वाळूची वाहतूक करून विक्री करीत असलेला ज्ञानेश्वर तायडे ऊर्फ नाना कोळी (३२, रा. कोळन्हावी, यावल) यांच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावास जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. त्यामुळे जिभाऊ गायकवाड यास एक वर्षासाठी अमरावती येथील कारागृहात स्थानबद्ध करण्याबाबतची कारवाई करण्यात आली आहे. तसेच नाना कोळी याला एक वर्षासाठी नागपूर येथील कारागृहात स्थानबद्ध करण्याबाबतची कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा – अखेर जलतरण तलावातील मृत्यूप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

जिल्ह्यात एमपीडीए कायद्यांतर्गत नोव्हेंबर २०२२ पासून आतापर्यंत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या १९ गुन्हेगारांवर नागपूर, अमरावती, ठाणे, नाशिक, येरवडा या मध्यवर्ती कारागृहांत स्थानबद्ध करण्याबाबतची कारवाई जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in crime in jalgaon district 19 criminals arrested in eight months ssb