जळगाव : शहरातील मानवसेवा विद्यालयातील उपक्रमशील चित्रकला शिक्षक सुनील दाभाडे यांनी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत दगडांवर देवींची आकर्षक अशी चित्रे रेखाटली आहेत. त्यात महाकाली माता, सप्तशृंगी, महालक्ष्मी, रेणुका आदी देवींच्या चित्रांचा समावेश आहे.
चित्रकार दाभाडे यांनी याआधीही वेगवेगळे प्रयोग केले आहेत. यापूर्वी त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र ज्वारीच्या भाकरीवर काढले होते. त्याची दखल ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेने घेऊन दाभाडेंचा गौरवही केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांची अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, ही कविता चक्क तव्यावर बहिणाबाईंच्या प्रतिमेसह आकर्षक रंगात चित्रित केली होती. याआधी नवरात्रोत्सवात सुपारीवर नऊ दिवसांच्या नऊ देवींची चित्रे काढली होती. यंदाच्या नवरात्रोत्सवात त्यांनी दगडांवर देवींची चित्रे काढली आहेत. करोना आपत्ती काळातही दाभाडे यांनी शहरातील चौकाचौकांतील रस्त्यांवर करोना विरोधात जनजागृतीसाठी चित्रे काढली होती.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher draw picures goddesses on stones navratri sunil dabhade jalgaon tmb 01
First published on: 03-10-2022 at 14:13 IST