चित्रपट हे असे प्रभावी माध्यम आहे की त्यात नवनवीन कल्पना आणि शोध हे त्यांच्या जन्माच्या खूप आधीच दिग्दर्शकाने मांडलेले असतात. याचे एक उदाहरण म्हणजे २ एप्रिल १९६८ ला प्रदर्शित झालेला ‘२००१ स्पेस ओडिसी’ हा हॉलीवूडचा चित्रपट.

सध्याच्या काळात एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर चर्चेत आहे वापरही वाढत आहे, पण १९६७ साली तयार झालेल्या या चित्रपटात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराविषयी भाष्य केले होते. त्यात दिसलेले चांद्रयान आणि गुरुत्वाकर्षणविरहित तंत्रज्ञानाचा उल्लेख आपल्याला काळाच्या खूपच पुढे घेऊन गेला होता. शास्त्रज्ञ नसलेल्या या चित्रपटाच्या लेखकाचे व त्याच्या दिग्दर्शकाचे नक्कीच खूप कौतुक वाटते. त्या चित्रपटात दिसलेला एचएल ९००० हा कॉम्प्युटर जेव्हा चित्रपटातील दोन अवकाशवीरांना ठार मारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो चित्रपट काळाच्या कितीतरी पुढे आहे, हे जाणवते.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal use of artificial intelligence in film amy
First published on: 25-03-2024 at 03:25 IST