डहाणू/कासा : आदिवासी बांधवांच्या विविध मागण्या घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले आहे. आंदोलनाला हजारोंची गर्दी उसळली असून महामार्ग अर्धा तास बंद ठेवण्यात आला होता. आंदोलनाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महामार्गावर दोनही वाहिनी बंद ठेवण्यात आल्या असून महामार्गावर दोनही बाजूला सात ते आठ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कडाक्याच्या उन्हात देखील आंदोलनाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलनाला डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले, मरियम ढवळे, अशोक ढवळे पक्षाचे पदाधिकारी आणि हजारो महिला व पूरूषांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Block the road with various demands of the communist party at charoti ysh