-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खानने तिच्या नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
-
गुलाबी रंगाच्या पारंपरिक वेशभूषेत हिनाने पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याची आणि दिलखेचक अदांची जादू दाखवली आहे.
-
या फोटोंमध्ये हिना खानने सुंदर भरतकाम केलेला फुशिया पिंक रंगाचा ड्रेस आणि त्याला साजेशी ओढणी परिधान केली आहे.
-
या पारंपरिक पोशाखात ती अत्यंत मनमोहक दिसत आहे.
-
तिचे केस मोकळे सोडलेले असून, मिनिमल मेकअप आणि पारंपरिक दागिने तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
-
विशेषतः तिच्या हातांवर असलेली सुंदर मेहंदी आणि बोटांतील मोठ्या अंगठ्या लक्ष वेधून घेत आहेत.
-
काही फोटोंमध्ये ती कॅमेऱ्याकडे थेट पाहत आहे, तर काहींमध्ये ती बाजूला पाहून स्माईल देत आहे, ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील हास्य अधिकच आकर्षक दिसत आहे.
-
या फोटोंना तिने “She is WON-DER-FUL…” असे कॅप्शन दिले आहे
-
तिच्या चाहत्यांनी तिच्या सौंदर्याची, तिच्या लूकची आणि तिच्या स्टाईलची प्रचंड प्रशंसा केली आहे.
-
हे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, हिना खान पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.
-
तिच्या या मनमोहक अदांनी तिने फॅशन विश्वात आपले स्थान किती भक्कम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य- हिना खान/इन्स्टाग्राम)
Photos: “देखा एक ख़्वाब तो ये सिलसिले हुए…” हिना खानचा गुलाबी रंगाच्या पारंपरिक ड्रेसमध्ये ‘मनमहाेक’ अंदाज
छोट्या पडद्यावरील ग्लॅमरस अभिनेत्री हिना खानने फुशिया पिंक रंगाच्या पारंपरिक पोशाखातील फोटो शेअर करत सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सुंदर भरतकाम, पारंपरिक दागिने आणि हातांवरील मेहंदी तिच्या लूकला उठावदार बनवत आहे. तिच्या सौंदर्याची आणि स्टाईलची चाहत्यांकडून खूप प्रशंसा होत असून, हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Web Title: Television actress hina khan pink traditional look photoshoot svk 05