-
प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा नवरा विक्की जैन हे त्यांच्या झगमगाटी लाइफस्टाईलमुळे आणि त्यांच्या प्रचंड संपत्तीमुळे सतत चर्चेत राहतात.
-
मुंबईतील त्यांच्या आलिशान घराबरोबरच बिलासपूरमध्येदेखील विक्की जैन यांचा मोठा बंगला आहे. या दोन्ही ठिकाणच्या संपत्तीवरून त्यांच्या श्रीमंतीचा ठसा स्पष्ट उमटतो.
-
लग्नानंतर अंकिता लोखंडेने आपल्या चाहत्यांना विक्कीच्या भव्य घराची झलक दाखवली होती. हे विशाल घर इतके देखणे आहे की ते एखाद्या राजवाड्यालादेखील मागे टाकेल.
-
बिग बॉस १७ मध्ये झळकलेले विक्की जैन एका समृद्ध व्यावसायिक कुटुंबातून येतात. त्यांचा कोळशाचा व्यापार तब्बल १०० कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले जाते. अलीकडेच ते लाफ्टर शेफ्स या कार्यक्रमातूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसले.
-
विविध अहवालांनुसार विक्की जैन यांची एकूण संपत्ती अंदाजे १३० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या जीवनशैलीवरूनही या आकड्याला दुजोरा मिळतो.
-
अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत विक्की जैन मुंबईतल्या भव्य ८ बीएचके अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. २०२२ मधील त्यांच्या लग्नानंतर त्यांनी चाहत्यांना या आलिशान घराचा खास परिचय करून दिला होता.
-
या घराची सजावट पांढऱ्या आणि सोनसळी रंगांच्या थाटात केलेली असून, प्रशस्त बाल्कनी आणि आकर्षक इंटिरियरमुळे हे अपार्टमेंट अधिकच देखणे वाटते. याशिवाय या जोडप्याजवळ मुंबईतच आणखी एक ३ बीएचके घरही आहे.
-
विक्की जैन आणि अंकिता लोखंडे यांच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचा समावेश आहे. विक्कीकडे लँड क्रूझर आणि मर्सिडीज-बेंझ असून, अंकिताकडे जग्वार एक्सएफ आणि पोर्श ७१८ आहे. हे जोडपे नेहमीच सोशल मीडियावर आपल्या लक्झरी कार्सचे दर्शन घडवत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे/ इंस्टाग्राम)
Photos: अंकिता लोखंडेचा नवरा विक्की जैन, ज्याची संपत्ती ऐकून तुम्ही व्हाल थक्क
अंकिता लोखंडे आणि विक्की जैन शाही जीवनशैलीचा आनंद घेतात आणि त्याची झलक ते वेळोवेळी चाहत्यांना दाखवत असतात.
Web Title: Actress ankita lokhande husband vicky jain net worth and luxurious life svk 05