• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganesh utsav 2022 girgaon boy made stunning home decoration for ganpati scsg

Photos: घरातच साकारलं साकारलं ‘गिरगाव’! २ महिन्यांचे कष्ट, आजी-आजोबांची मदत अन् थक्क करणारी गणपतीची घरगुती सजावट

या देखाव्यामधील अगदी लहान लहान गोष्टी इतक्या काळजीपूर्वक साकारण्यात आल्या आहेत की पाहणारा खरोखरच थक्क होऊन जातो

Updated: September 6, 2022 19:08 IST
Follow Us
  • Ganesh utsav 2022 Girgaon Boy made stunning home decoration for Ganpati
    1/18

    गेल्या काही वर्षांमध्ये गिरगाव परिसरात पुनर्विकासाचे जोरदार वारे वाहू लागले असून अनेक चाळींच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. मराठी टक्का आटला असला तरी आजही या भागात उत्सव संस्कृतीचे दर्शन घडत आहे. याच उत्सव संस्कृतीच्या परंपरेचे दर्शन गिरगावला खेटून असलेल्या चिराबाजार परिसरातील एका युवकाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या घरातच घडविले आहे.

  • 2/18

    गिरगावात साजरी होणारी मकरसंक्रांत, गुढीपाडवा, गणेशोत्सव, दिवाळी, आषाढी एकादशीच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या दिंडीचे दर्शन देखाव्याच्या माध्यमातून घडविण्यात आले आहे.

  • 3/18

    यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होत असून भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्यामुळे अनेकांनी घरामध्ये मोठ्या प्रमाणावर सजावट केली आहे.

  • अनेकांनी सामाजिक प्रश्नांवर आधारित देखावे साकारले आहे. काही देखाव्यांमधून सामाजिक संदेश देण्यात आले आहेत. काही मंडळींनी अगदी छोट्या जागेत आकर्षक देखावे साकारून भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
  • 4/18

    असाच एक देखावा गिरगावजवळच असलेल्या चिराबाजार परिसरातील जगन्नाथ शंकर शेठ मार्गावरील ४७९ कृष्णा बिल्डिंग, तिसरा मजला खोली क्रमांक ८ मध्ये साकारला आहे.

  • 5/18

    पारंपरिक पद्धतीने सण-उत्सव साजरे होण्याचे मुंबईतील एक ठिकाण म्हणजे गिरगाव. कुणे एकेकाळी हा परिसर अस्सल मराठमोळा भाग म्हणून ओळखला जात होता.

  • 6/18

    मात्र कौलाघात मराठी टक्का ओसरत गेला आणि हळूहळू मराठी संस्कृती लोप पावते की काय अशी भिती निर्माण झाली. मात्र या परिस्थितीतही उरल्यासुरल्या मराठी भाषकांनी आपले उत्सव पूर्वीप्रमाणेच उत्साहाने सुरू ठेवले आहेत.

  • 7/18

    डिसेंबरची गुलाबी थंडी पडू लागताच गिरगावकर आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांना मकरसंक्रांतीचे वेध लागायचे.

  • 8/18

    आकाशात भिरभिरणारे रंगेबीरंगी पतंग दृष्टीस पडायचे. हवेत भिरभिरणारे पतंग कापण्याची स्पर्धाच लागायची. मकरसंक्रांतीचा दिवस पतंग उडवून साजरा व्हायचा.

  • 9/18

    अगदी अबालवृद्ध मंडळी, महिलाही या उत्सवात रंगून जायची. होळी, गुढीपाडवा, दहीहंडी, गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्रौत्सव असे एकामागून एक येणारे सण-उत्सव गिरगावात मोठ्या उत्साहात साजरे व्हायचे.

  • 10/18

    मुंबईमधील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव गिरगावातील केशवजी नाईकांच्या चाळीत सुरू झाला. त्यानंतर हळूहळू गिरगावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढत गेली.

  • 11/18

    गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभा यात्रेने मुंबईकरांची पसंती मिळविली. गिरगावच्या या उत्सव संस्कृतीचे दर्शन मन रेळे याने आपल्या चिराबाजारातील घरात घडविले आहे.

  • 12/18

    आजी, आजोबा, आई, वडील आणि घरातील इतर सदस्यांच्या मदतीने मन याने घराच्या एका खोलीमध्ये निरनिराळ्या सण-उत्सवाचा देखावा साकारला आहे.

  • 13/18

    गणेशोत्सव, आनंद वारी, दिवाळी, मकरसंक्रांत आणि गुढी पाडव्याची शोभायात्रा आदींचा त्यात समावेश आहे. आकर्षक रंगसंगतीने देखावा लक्षवेधी ठरत आहे.

  • 14/18

    या देखावा साकारण्यासाठी तब्बल दोन महिने लागले. या देखाव्यात गिरगावातील गिरगाव चर्चजवळील मोठा चौक साकारण्यात आला आहे.

  • 15/18

    संपूर्ण सजावटीसाठी सनबोर्ड, कार्डपेपर, कापड, शाडू माती आदी पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर करण्यात आला आहे, असे मन रेळेने सांगितले.

  • 16/18

    गिरगावातील उत्सव संस्कृतीचे एकाच छताखाली दर्शन घडविण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, असेही तो म्हणाला.

  • 17/18

    हा गणपती पाहण्यासाठी स्थानिक लोक आवर्जून रेळेंच्या घरी येत आहेत.

TOPICS
गणेशोत्सव २०२४
Ganeshotsav

Web Title: Ganesh utsav 2022 girgaon boy made stunning home decoration for ganpati scsg

IndianExpress
  • ‘Very big one’: Donald Trump hints at trade deal with India after China pact
  • Need to discuss if socialist, secular should remain in Preamble: RSS Gen Secy Dattatreya Hosabale
  • The Emergency, 50 years on: A father’s fight to ensure son’s death wasn’t lost in the darkness
  • ‘Think of how an old post may be problematic, then delete it’: New US Visa rule fuels student anxiety over social media
  • Revision of Bihar electoral rolls: Why, how
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.