-
हळदीचे पाणी आणि हळदीचे दूध हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर असून हळदीमधील कर्क्युमिनमुळे शरीरात अँटीऑक्सिडंट, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
-
हळदीचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी हळद पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात आणि पचनशक्ती सुधारते, तसेच वजन नियंत्रणात राहते.
-
हळदीचे दूध रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास झोपेची गुणवत्ता सुधारते, सांधेदुखी कमी होते आणि शरीराला आराम मिळतो.
-
हळदीचे पाणी तयार करताना १/४ चमचा हळद १ कप पाण्यात मिसळून उकळल्यास अधिक फायदेशीर ठरते.
-
हळदीचे दूध तयार करताना १/४ चमचा हळद १ कप उकळत्या दुधात मिसळणे गरजेचे असून दुधातील चरबी कर्क्युमिनचे शोषण वाढवते.
-
दोन्ही मिश्रणे गरम पिणे अधिक लाभदायक आहे आणि जर हळदीच्या पाण्यात थोडी काळी मिरी पावडर घातली तर ते अधिक लाभदायक आहे.
-
हळदीचे पाणी आणि दूध अति प्रमाणात सेवन केल्यास काही लोकांना पचनास त्रास होऊ शकतो, त्यामुळे प्रमाण लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
-
???गॅल्ब्लॅडर???(की गॅलब्लॅडर) समस्या, रक्तदाब कमी करणारी औषधे, लोहाची कमतरता, किडनी स्टोन किंवा संवेदनशील पचन असलेल्यांनी हळदीचे सेवन कमी करावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
-
सकाळी हळदीचे पाणी आणि रात्री हळदीचे दूध हे संयोजन आरोग्यासाठी सर्वोत्तम ठरते, तसेच वनस्पती आधारित दूध वापरत असल्यास शोषणावर परिणाम होऊ शकतो.(फोटो सौजन्य : FreePik)
हळदीचे पाणी की हळदीचे दूध; आरोग्यासाठी कोणते पेय फायदेशीर आणि कोणत्या वेळेत प्यावे?
सकाळी हळदीचे पाणी, रात्री हळद दूध; फायदे, काळजी आणि योग्य सेवनाची माहिती जाणून घ्या.
Web Title: Turmeric water vs turmeric milk health benefits morning detox night immunity health tips svk 05