-
व्यायम करतेवेळी पुरेशा विश्रांती न घेता शरिराला खूप ताण दिल्याने, त्याचा परिणाम केवळ तुमच्या कामगिरीवरच होत नाही, तर तो गंभीर कार्डियाक स्ट्रेन (हृदयावर ताण) वाढवतो आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो. (Source: Photo by unsplash )
-
अभ्यासातून असे दिसून आले आहे की अतिव्यायाम केल्याने धमन्यांची ताठरता (Arterial Stiffness) वाढते (रक्त वाहण्यास अडचण होते). तसेच, स्ट्रोक व्हॉल्यूम (Stroke Volume) कमी होतो – म्हणजेच हृदय प्रत्येक ठोक्यागणिक बाहेर टाकणाऱ्या रक्ताचे प्रमाण घटते. यामुळे हृदय व रक्तवहिन्यासंबंधी प्रणालीवर मोठा ताण येऊ शकतो. (Source: Photo by unsplash )
-
अनियमित हृदय लय : विश्रांतीशिवाय दीर्घकाळ चालणारे किंवा उच्च तीव्रतेचे सत्र (Long endurance or high intensity sessions) हे हृदयाची असामान्य लय (Abnormal Heart Rhythms) निर्माण करू शकते. विशेषतः ज्या लोकांमध्ये हृदयाच्या समस्या आधीपासूनच आहेत, त्यांच्यासाठी हा धोका अधिक असतो. (Source: Photo by unsplash )
-
लपलेले विकार समोर येतात: उच्च तीव्रतेच्या व्यायमामुळे निदान न झालेले हृदयरोग (जसे की कार्डिओमायोपॅथी, ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या) उघड होऊ शकतात किंवा आणखी बिघडू शकतात ज्यामुळे अत्यधिक श्रम करताना हृदयविकाराच्या झटक्यासारख्या घटना होण्याची शक्यता वाढते. (Source: Photo by unsplash )
-
अति-ट्रेनिंगमुळे हृदय व रक्तवाहिन्यांवर ताण येतो : अति-ट्रेनिंग केल्याने रेस्टिंह हार्ट रेट (resting heart rate), रक्तदाब वाढतो आणि हृदयावर संरचनात्मक ताण येतो. यामुळे हृदयाला दीर्घकाळ जास्त, कधीकधी खूप जास्त, काम करावे लागते. (Source: Photo by unsplash)
-
सुरुवातीच्या लक्षणांवर लक्ष ठेवा : व्यायामादरम्यान छातीत जडपणा, अत्यधिक थकवा, चक्कर येणे किंवा असामान्य श्वास लागणे यासारख्या गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. हे अतिरेकी व्यायाम किंवा दडलेल्या हृदयरोगाचे संकेत देऊ शकतात, ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या. (Source: Photo by unsplash )
-
तुमच्या हृदयाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही काय करू शकता: तुमच्या ट्रेनिंग योजनेत विश्रांतीचे दिवस आणि रिकव्हरी आठवडे यांचा समावेश करा. वाढलेला रेस्टिंग हॉर्ट रेट, बिघडत चाललेली कामगिरी, मूड बदल यासारख्या लक्षणांवर लक्ष ठेवा. योग्य पोषण, झोप आणि हायड्रेशनची काळजी घ्या. (Source: Photo by unsplash )
अतिव्यायाम आणि हृदयविकार : नेमकं काय आहे कनेक्शन?
अतिव्यायम आणि परिणामी हृदयविकाराच्या धोक्यांबद्दल तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे अवश्यक आहे.
Web Title: Know the link between overtraining and heart attack 10262962 iehd import rak