-
हल्लीची जीवनशैली बघता केसगळतीची समस्या महिला आणि पुरूषांसाठी सामान्य झाली आहे. परंतु जास्त केस गळणे हे एक धोक्याचे लक्षण असू शकते. दररोज मोठ्या प्रमाणात केस गळणे हे टक्कल पडण्याची सुरुवात दर्शवू शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
हल्ली अनेक पुरुषांचे २०-२५ वर्षांच्या वयातच टक्कल दिसून लागले आहे. या टक्कल पडण्याची अनेक कारणे आहेत. कधीकधी, केसांची काळजी घेण्याच्या चुका देखील यामध्ये भर घालू शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
केस गळतीमागे अनुवंशिकता हे कारण असू शकते. जर तुमच्या वडिलांचे किंवा आजोबांचे केस लहान वयातच गळायला लागले असतील, तर तुमचे केसही लहान वयातच गळायला लागण्याची शक्यता असते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
झोप ही अशी वेळ असते जेव्हा तुमचे शरीर स्वतःची दुरुस्ती करते. या काळात केसांचे हेयर फॉलिकल्स देखील दुरुस्त होतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
डीएचटी हा एक पुरुष संप्रेरक आहे ज्याच्या असंतुलनामुळे केस गळती वाढू शकते.(फोटो सौजन्य: Freepik)
-
त्वचारोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे की धूम्रपान आणि मद्यपान केल्याने केस गळू शकतात. ते टाळूला होणारा रक्तपुरवठा रोखतात, ज्यासाठी तुमच्या केसांना ऑक्सिजनची आवश्यकता असते. (फोटो सौजन्य: Freepik) -
कोंड्यामुळे केस गळती थेट होत नाही, पण जर तुम्ही कोंड्यामुळे सतत डोके खाजवत राहिलात तर हो, त्यामुळे केस गळती वाढू शकते.(फोटो सौजन्य: Freepik) -
गरम पाण्यामुळे केस गळत नाहीत, तर टाळू कोरडे पडते. यामुळे केस कोरडे दिसू शकतात. (फोटो सौजन्य: Freepik) -
दररोज शाम्पू लावण्याने देखील केस गळू शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
(फोटो सौजन्य: Freepik)
मुलांनो, २०-२५ वयापासूनच तुमचेही केस गळू लागलेत? टक्कल होण्याआधीच थांबा, दररोज करत असलेल्या ‘या’ चुका टाळा..
Hair Care Mistakes: हल्ली अनेक पुरुषांचे २०-२५ वर्षांच्या वयातच टक्कल दिसून लागले आहे. या टक्कल पडण्याची अनेक कारणे आहेत. कधीकधी, केसांची काळजी घेण्याच्या चुका देखील यामध्ये भर घालू शकतात.
Web Title: Hair care boys have you also started losing your hair since the age of 25 avoid these mistakes you make every day sap