-

पावडर करून सेवन केल्या जाणाऱ्या औषधी वनस्पती पचायला सोप्या असतात. तसेच त्या इतर पदार्थांमध्ये मिसळता येतात आणि त्यांचे बरेच आरोग्य फायदे देखील असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही औषधी वनस्पतींची माहिती देणार आहोत. (PC : Unsplash)
-
आवळा पावडर : भारतीय आवळ्याची पावडर व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहे आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास, केस व त्वचेचे आरोग्य सुधारण्यास आणि पचनास मदत करते.(PC : Unsplash)
-
अश्वगंधा पावडर : ‘इंडियन जिनसेंग’ म्हणून ओळखली जाणारी ही औषधी वनस्पती ताण कमी करण्यास, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि उर्जेची पातळी वाढवण्यास मदत करते. (PC : Unsplash)
-
तुळशीची पावडर : पावडर स्वरूपातील तुळस चहा किंवा स्मूदीमध्ये घालता येते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती, श्वसन आरोग्य आणि ताण व्यवस्थापनास मदत होते. (PC : Unsplash)
-
आल्याची पावडर : पचनशक्ती वाढवणारे आले पावडर स्वरुपातही घेता येते. आले मळमळ दूर करते, चयापचय सुधारते आणि जळजळ कमी करते. (PC : Unsplash)
-
मोरिंगा पावडर : मोरिंगाच्या पानांची पावडरही खूप उपयुक्त असते. मोरिंगा जीवनसत्त्वे, आयर्न आणि अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण आहे, ज्यामुळे एकूणच आरोग्य सुधारतं. (PC : Unsplash)
-
हळद: हळद ही दाह-विरोधी, अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध आहे. हळदीचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. हळद पचन सुधारण्यासही मदत करते. (PC : Unsplash)
पावडर स्वरूपात सेवन करता येणाऱ्या सहा भारतीय औषधी वनस्पती आणि त्यांचे फायदे
आम्ही तुम्हाला अशा काही औषधी वनस्पतींची माहिती देणार आहोत ज्यांचं पावडर स्वरुपात सेवन करता येतं.
Web Title: These 6 indian herbs can be consumed in powdered form better for health asc