-
स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजी छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी महाराष्ट्राच्या परिवर्तनाची क्रांती होणार, असे सूचक वक्तव्य केले होते.
-
त्यांच्या या विधानानंतर संभाजी छत्रपती आपल्या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
-
त्यांनी ९ ऑगस्ट रोजी आपल्या समर्थकांना तुळजापूर येथे येण्याचे आवाहन केले होते.
-
दरम्यान, आज संभाजी छत्रपती यांनी आपल्या समर्थकांच्या उपस्थितीत स्वराज्य संघटनेचे बोधचिन्ह आणि ध्वाजाचे अनावरण केले.
-
यावेळी संभाजी छत्रपतींचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
यावेळी संभाजी छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेच्या पहिल्या शाखेचा शुभारंभ केला.
-
याआधी राज्यसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेने पाठिंबा न दिल्यामुळे संभाजी छत्रपती यांना माघार घ्यावी लागली होती.
-
त्यानंतर संभाजी छत्रपती यांनी आपण नव्या संघटनेची सुरुवात करणार आहोत, अशी घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली होती.
-
मे महिन्यात त्यांनी स्वराज्य या संघटनेच्या स्थापनेची घोषणा केली होती.
-
या संघटनेच्या माध्यमातून माझा हा राजकीय वाटचालीचा पाहिलाच टप्पा असल्याचे संभाजी छत्रपती म्हणाले होते.
-
संघटनेचे बोधचिन्ह काय असावे, झेंडा कसा असावा? याबाबतच्या सूचना त्यांनी जनतेला विचारल्या होत्या.
-
त्यानंतर आता संभाजी छत्रपती यांनी आज स्वराज्य या संघटनेचे बोधचिन्ह तसेच झेंड्याचे अनावरण केले.
तुळजापुरात ‘स्वराज्य’च्या पहिल्या शाखेचे उद्घाटन, संभाजी छत्रपतींनी केले बोधचिन्ह आणि झेंड्याचे अनावरण
संभाजी छत्रपती आपल्या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
Web Title: Sambhaji chhatrapati unveils symbol and flag of his swaraj organisation in tuljapur prd