• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. tcs layoffs it company tata consultancy services offering up to 2 years severance pay and ore check details here marati news rak

TCS चा मोठा निर्णय! नोकरी गेली तरी टेन्शन नाही, कारण कर्मचार्‍यांना मिळणार….

टीसीएसने काही दिवसांपूर्वी त्यांच्या १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची घोषणा केली आहे.

Updated: October 4, 2025 13:56 IST
Follow Us
  • v
    1/8

    आयटी क्षेत्रतील दिग्गज कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) काही दिवसांपूर्वी त्यांच्या १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची घोषणा केली आहे.

  • 2/8

    मात्र देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीने काढून टाकण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विचार करत एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी या कर्मचाऱ्यांन रिकाम्या हाताने बाहेर काढणार नाही, तर दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनी ‘निलंबन भत्ता’ (सेव्हरन्स पॅकेज) देऊ करत असल्याचे म्हटले आहे.

  • 3/8

    टिसीएस या सर्व प्रभावित कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या कालावधीनुसार सहा महिने ते दोन वर्षांच्या पगाराचे आकर्षक सेव्हरन्स पॅकेज देणार आहे. असे सेव्हरन्स पॅकेज कर्मचाऱ्याला आर्थिक भरपाई म्हणून दिली जाते. हे पॅकेज नेमके किती असेल याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

  • 4/8

    कोणत्याही प्रोजेक्टशिवाय ८ महिन्यांपासून बेंचवर असलेले कर्मचाऱ्यांना त्यांचा तीन महिन्यांचा ‘नोटिस पीरियड पे’ मिळणार आहे,

  • 5/8

    किती पैसे मिळणार?
    टीसीएस कंपनीमध्ये १० ते १५ वर्षे सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना अंदाजे १.५ वर्षांच्या पगाराइतके पॅकेज मिळेल.

  • 6/8

    टीसीएसमध्ये १५ वर्षांपेक्षा जास्त सेवा असलेले वरिष्ठ कर्मचाऱ्यांना सर्वाधिक लाभ मिळेल. अशा कर्मचाऱ्यांना १.५ ते २ वर्षांचा पगार सेव्हरन्स पॅकेज म्हणून मिळू शकतो.

  • 7/8

    कंपनी कर्मचाऱ्यांना नवीन नोकऱ्या शोधण्यात मदत करण्यासाठी तीन महिन्यांच्या आउटप्लेसमेंट सर्व्हिसेससाठीची एजन्सी फी भरत आहे. टीसीएस केअर्स प्रोग्राममध्ये कर्मचाऱ्यांना थेरपिस्ट आणि समुपदेशन सेवांद्वारे मानसिक आरोग्यासाठी मदत केली जात आहे.

  • 8/8

    निवृत्तीच्या वयाच्या जवळ असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अर्ली रिटायरमेंट पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामध्ये सर्व लाभांसह अतिरिक्त ६ महिने ते २ वर्षांचा पगाराचा समावेश आहे.

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Tcs layoffs it company tata consultancy services offering up to 2 years severance pay and ore check details here marati news rak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.