-

कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय महिला संंघाने विश्वचषक २०२५ चे जेतेपद आपल्या नावे केले.
-
भारतीय महिला क्रिकेट संघाचे कोच अमोल मुझुमदार यांचं मोठं योगदान आहे. त्यांनी २०२३ मध्ये महिला संघाचे कोच म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने २०२५ चा विश्वचषक पटकावला.
-
भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच महिला विश्वचषक पटकावला आणि यानंतर संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचला. या भेटीचे काही फोटो समोर आले आहेत.
-
संपूर्ण भारतीय महिला संघ फॉर्मल्स घालत गळ्यात विजयी मेडल घालून विश्वचषकाच्या ट्रॉफीसह पंतप्रधानांच्या भेटीला पोहोचले होते.
-
या भेटीदरम्यान कर्णधार हरमनप्रीत कौर व उपकर्णधार स्मृती मानधना यांनी ही ट्रॉफी पंतप्रधानांसमोर धरत फोटो काढला. ही ट्रॉफी तुम्ही मेहनतीने जिंकलेली आहे, त्यामुळे ही ट्रॉफी पकडण्याचा मान तुमचा असं मोदींनी टी-२० वर्ल्डकप विजयानंतर भारतीय संघाला सांगितलं होतं, तेच त्यांनी इथेही लागू केलं.
-
पंतप्रधान मोदींनी वेळ काढत भारतीय महिला संघाची भेट घेत त्यांच्याशी चर्चा देखील केली.
-
भारतीय महिला संघ, कोच अमोल मुझुमदार व बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मन्हास अशी टीम पंतप्रधानांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी पोहोचली होती.
-
पंतप्रधान मोदींशी भेटीदरम्यान भारतीय संघाच्या खेळाडूंनी त्यांच्याशी संवाद साधला आणि विश्वचषक, याचबरोबर त्यांच्या एकंदरीत क्रिकेट कामगिरीबद्दल चर्चा केली.
-
भारतीय महिला संघाने टीम इंडियाच्या भेटीदरम्यान खास जर्सी पंतप्रधानांना भेट दिली. या जर्सीवर नमो असं लिहिलं असून १ नंबर जर्सीला दिला आहे. तर जर्सी क्रमांकाच्या बाजूला भारतीय संघातील सर्व खेळाडूंची नाव व त्यांच्या सह्या आहेत.(फोटो सौजन्य-@BCCI, @ANI)
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाने पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट; पाहा Photos
India Women’s Team Meet With PM Narendra Modi: वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यादरम्यान टीम इंडियाने पंतप्रधानांना खास जर्सी भेट दिली.
Web Title: India women team meets pm narendra modi presents him special special signed namo jersey world cup 2025 bdg