-

या हंगामात आयपीएलची पहिलीच ट्रॉफी जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला लवकरच नवा मालक मिळणार आहे. या संघाच्या संघमालकांनी संघ विकायला काढला आहे. त्यामुळे आगामी हंगामापूर्वी या संघाा नवा संघमालक मिळणार हे निश्चित आहे. दरम्यान कोण आहेत या संघासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराट हा या संघातील एकमेव खेळाडू आहे, जो पहिल्या हंगामापासून या संघाचा भाग आहे. त्याला या संघाकडून २८२ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने ९०८५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ८ शतकं आणि ६५ अर्धशतकं झळकावली आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या एबी डिविलियर्सनने या संघाकडून खेळताना १५७ सामन्यांमध्ये ४५२२ धावा केल्या आहेत. यादरम्यान २ शतकं आणि ३७ अर्धशतकं झळकावली आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने या संघाकडून खेळताना ९१ सामन्यांमध्ये ३४२० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५ शतकं आणि २१ अर्धशतकं झळकावली आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
यादीत चौथ्या स्थानी असलेल्या फाफ डू प्लेसिसने ४५ सामन्यांमध्ये १६३६ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
पाचव्या स्थानी असलेल्या जॅक कॅलिसने ४६ सामन्यांमध्ये १२७१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ११ शतकं झळकावली आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)
IPL स्पर्धेत RCB साठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, पाहा टॉप ५ फलंदाजांची यादी
Most Runs For RCB: कोण आहेत आरसीबीसाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज? जाणून घ्या.
Web Title: Top 5 batters to scored most runs for royal challengers bengaluru cricket news in marathi amd