• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. jio postpaid plus plans netflix amazon disney plus hotstar free know everything about it scsg

जिओचा भन्नाट प्लॅन… Netflix, Prime, Hotstar बरोबरच 500 GB डेटाही Free; विशेष फॅमेली प्लॅनही उपलब्ध

या प्लॅनमध्ये कॉलिंगची सेवाही मोफत देण्यात आलीय

September 22, 2020 18:38 IST
Follow Us
  • रिलायन्स जिओने आपल्या भारतीय ग्राहकांसाठी नवा जिओ पोस्टपेड प्लस प्लॅन बाजारात आणला आहे. या प्लॅनअंतर्गत भारतीय ग्राहकांना आणखीन उत्तम सेवा, कनेक्टिव्हिटी, मनोरंजन आणि इतर सुविधा देण्याचा कंपनीचा मानस आहे. या प्लॅनमध्ये युझर्सला काही खास सेवा पुरवल्या जाणार आहेत. यामध्ये ग्राहकांना 'नेटफ्लिक्स', 'अ‍ॅमेझॉन प्राइम' आणि 'डिस्ने प्लस हॉटस्टार'चं सबक्रिप्शन मोफत मिळणार आहे. त्याचबरोबर यामध्ये कॉलिंगसंदर्भातील फायदेही ग्राहकांना मिळणार आहेत. नक्की काय आहे हा प्लॅन जाणून घेऊयात... (फोटो सौजन्य : पीटीआय)
    1/

    रिलायन्स जिओने आपल्या भारतीय ग्राहकांसाठी नवा जिओ पोस्टपेड प्लस प्लॅन बाजारात आणला आहे. या प्लॅनअंतर्गत भारतीय ग्राहकांना आणखीन उत्तम सेवा, कनेक्टिव्हिटी, मनोरंजन आणि इतर सुविधा देण्याचा कंपनीचा मानस आहे. या प्लॅनमध्ये युझर्सला काही खास सेवा पुरवल्या जाणार आहेत. यामध्ये ग्राहकांना 'नेटफ्लिक्स', 'अ‍ॅमेझॉन प्राइम' आणि 'डिस्ने प्लस हॉटस्टार'चं सबक्रिप्शन मोफत मिळणार आहे. त्याचबरोबर यामध्ये कॉलिंगसंदर्भातील फायदेही ग्राहकांना मिळणार आहेत. नक्की काय आहे हा प्लॅन जाणून घेऊयात… (फोटो सौजन्य : पीटीआय)

  • 2/

    एन्टर्टेनमेंट प्लस : ग्राहकांना 'नेटफ्लिक्स', 'अ‍ॅमेझॉन प्राइम' आणि 'डिस्ने प्लस हॉटस्टार'चं सबक्रिप्शन मोफत मिळणार. यामध्ये ग्राहकांना जिओच्या अ‍ॅप्सचा फायदा घेता येणार आहे. यामध्ये ६५० हून अधिक लाइव्ह चॅनेल, व्हिडिओ कंटेंट, पाच कोटी गाणी आणि ३०० हून अधिक वृत्तपत्रांचा समावेश आहे. 

  • 3/

    फिचर्स प्लस : यामध्ये संपूर्ण कुटुंबासाठी केवळ २५० रुपये प्रति कनेक्शन दराने प्लॅन देण्यात येईल. संपूर्ण कुटुंबातील सदस्यांसाठी या प्लॅनअंतर्गत कनेक्शन घेता येईल. (फोटो सौजन्य : पीटीआय)

  • 4/

    संग्रहीत

  • 5/

    इंटरनॅशनल प्लस : भारताच्या बाहेर प्रवास करणाऱ्या भारतीयांना पहिल्यांदाच इन फ्लाइट म्हणजेच विमानामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीची सेवा पुरवली जाईल. अमेरिका आणि युएईसाठी मोफत आंतरराष्ट्रीय कॉलिंगची सेवा दिली जाईल. आंतरराष्ट्रीय कॉलिंगसाठी सुरुवातीचे दर ५० पैसे प्रति मिनिटं इतके असतील.

  • 6/

    कॉलिंगच्या प्लॅनच्या किंमती ३९९ रुपयांपासून ते १४९९ रुपयांपर्यंत आहेत. (फोटो सौजन्य : एफपी)

  • 7/

    ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ७५ जीबी डेटा मिळतो. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस आणि एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. ग्राहकांना 'नेटफ्लिक्स', 'अ‍ॅमेझॉन प्राइम' आणि 'डिस्ने प्लस हॉटस्टार'चं सबक्रिप्शन मोफत मिळणार असून २०० जीबी डेटा रोलओव्हर मिळणार आहे. (फोटो सौजन्य : एफपी)

  • 8/

    ५९९ चा प्लॅन : ५९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये १०० जीबी डेटा मिळतो. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस आणि एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. ग्राहकांना 'नेटफ्लिक्स', 'अ‍ॅमेझॉन प्राइम' आणि 'डिस्ने प्लस हॉटस्टार'चं सबक्रिप्शन मोफत मिळणार असून २०० जीबी डेटा रोलओव्हर मिळणार आहे. ग्राहकांना यामध्ये फॅमेली प्लॅनसाठी एक अतिरिक्त सीम कार्ड देण्यात येईल. (फोटो : धीरज सिंग/ ब्लुमबर्ग)

  • 9/

    ७९९ चा प्लॅन : ७९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये १५० जीबी डेटा मिळतो. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस आणि एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. ग्राहकांना 'नेटफ्लिक्स', 'अ‍ॅमेझॉन प्राइम' आणि 'डिस्ने प्लस हॉटस्टार'चं सबक्रिप्शन मोफत मिळणार असून २०० जीबी डेटा रोलओव्हर मिळणार आहे. ग्राहकांना यामध्ये फॅमेली प्लॅनसाठी दोन अतिरिक्त सीम कार्ड देण्यात येतील. (फोटो सौजन्य : अमित दवे, रॉयटर्स)

  • 10/

    ९९९ चा प्लॅन : ९९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये २०० जीबी डेटा मिळतो. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस आणि एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. ग्राहकांना 'नेटफ्लिक्स', 'अ‍ॅमेझॉन प्राइम' आणि 'डिस्ने प्लस हॉटस्टार'चं सबक्रिप्शन मोफत मिळणार असून ५०० जीबी डेटा रोलओव्हर मिळणार आहे. ग्राहकांना यामध्ये फॅमेली प्लॅनसाठी तीन अतिरिक्त सीम कार्ड देण्यात येतील. (फोटो सौजन्य : पीटीआय)

  • 11/

    १४९९ चा प्लॅन : १४९९  रुपयांच्या या प्लॅनमध्ये ३०० जीबी डेटा मिळतो. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस आणि एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. ग्राहकांना 'नेटफ्लिक्स', 'अ‍ॅमेझॉन प्राइम' आणि 'डिस्ने प्लस हॉटस्टार'चं सबक्रिप्शन मोफत मिळणार असून ५०० जीबी डेटा रोलओव्हर मिळणार आहे. अमेरिका आणि युएईसाठी मोफत आंतरराष्ट्रीय कॉलिंगची सेवा दिली जाईल. (फोटो सौजन्य : पीटीआय)

Web Title: Jio postpaid plus plans netflix amazon disney plus hotstar free know everything about it scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.