-
बर्मिंगहॅम २०२२ कॉमनवेल्थ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने चमकदार कामगिरी केली आहे.
-
या स्पर्धेत अविनाशनने रौप्य पदक जिंकले आहे.
-
अविनाश हा सुवर्णपदक विजेत्या अब्राहम किबिव्होटपेक्षा फक्त ०.५ सेकंद मागे होता.
-
आत्तापर्यंत या स्पर्धेत पहिले तिनही क्रमांकावर केनियाचे स्पर्धेक असायचे. मात्र, पहिल्यांदा अविनाशने हा विक्रम मोडीत काढला आहे.
-
या स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारा अविनाश हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
-
या विजयानंतर अविनाशवर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अविनाशचे कौतुक केले आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रोत्साहनामुळेच मला यश मिळाले असल्याची भावना अविनाशने व्यक्त केली आहे.
-
अविनाश हा मूळचा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा गावचा.
-
अविनाशने स्वत:ला खेळाकडे नेण्याचा विचार कधीच केला नाही. त्याला सैन्यात भरती होऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा होता.
-
१२वी नंतर अविनाश सैन्यात भरती झाला आणि ५ महार रेजिमेंटचा भाग बनले.
-
आर्मीमध्ये असताना त्याला अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळाली.
-
२०१७ मध्ये त्याच्या सैन्य प्रशिक्षकाने त्याला स्टीपलचेसमध्ये धावण्याचा सल्ला दिला.
-
२०१८ साली भुवनेश्वर येथे झालेल्या ओपन नॅशनल स्पर्धेमध्ये साबळेने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ८:२९.८८ वेळ नोंदवत ३० वर्षांचा राष्ट्रीय विक्रम मोडला.
-
२०१९ साली पटियाला येथे झालेल्या फेडरेशन कपमध्ये साबळेने नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.
-
या स्पर्धेत जरी रौप्य पदक जिंकले तरी येणाऱ्या काळात सुर्वणपदक जिंकण्याचा मानस अविनाशने व्यक्त केला आहे.
Photos : एकेकाळी खायला भाकरी नव्हती, १२ किमी पायपीट, सैन्यात राहून देशसेवा केली, रौप्य पदक जिंकणाऱ्या अविनाश साबळेच्या संघर्षाची अनटोल्ड स्टोरी
महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने बर्मिंगहॅम २०२२ कॉमनवेल्थ गेम्समध्ये चमकदार कामगिरी करत भारताची मान उंचावली आहे.
Web Title: Commonwealth games 2022 silver medal winner avinash sables struggle story dpj