विवाह न केल्यास विषारी ओैषध देऊन आत्महत्येची धमकी देणाऱ्या एका तरुणाच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी विष्णू विठ्ठल मुंडे (वय २३ रा. भोगलवाडी, जि. बीड) याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत तरूणीने फिर्याद दिली आहे. आरोपी विष्णू मुंडे याचे फिर्यादी तरूणीबरोबर प्रेमसंबंध होते. विष्णूने तरूणीच्या आई-वडिलांना शिवीगाळ केल्याने तिने त्याच्याबरोबर असलेले प्रेमसंबंध तोडून टाकले. तरुणी कात्रज भागात तिच्या बहिणीच्या घरी राहायला आहे. विष्णूने तरुणीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. माझ्याशी विवाह न केल्यास तुझा विवाह होऊ देणार नाही, अशी धमकी त्याने तरुणीला दिली.

तरुणीच्या बहिणीला शिवीगाळ केली तसेच विवाह न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी तरुणीला दिली. घाबरलेल्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मुंडे विरोधात धमकी तसेच विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 23 year old arrested by pune police for eve teasing pune print news scsg