शिरुर : पोलिसिंग मध्ये जनतेचा सहभागही महत्वाचा असल्याचे सांगून ग्राम सुरक्षा पथक गाव पातळीवर प्रभावीपणे कार्यरत करावित अशी सूचना पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले यांनी केली . शिरुर येथील प्रशासकिय इमारतीतील सभागृहात व्यापारी पोलीस पाटील व व्यापारी , व्यवसायिक यांची बैठक शिरुर पोलीसांच्या वतीने आयोजित करण्यात आली. त्यात ढोले यांनी मार्गदर्शन केले . पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यावेळी उपस्थित होते . ढोले यावेळी म्हणाले की पोलीसिंग मध्ये जनतेचा सहभागही महत्वाचा आहे .ग्राम सुरक्षा पथक गाव पातळीवर प्रभावीपणे कार्यरत करावित . सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत . गाव पातळीवर पोलीस पाटील हे नागरिक व पोलीसा मधील दुवा आहे .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घर मालकांनी भाडेकरुची माहिती ठेवावी व पोलीस ठाण्याला ही द्यावी अशी सूचना त्यांनी केली .शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देऊन पोलीस मित्र व प्रत्येक गावचे पोलीस पाटील यांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहिती पोलीस स्टेशनला तातडीने पुरवणे गरजेचे आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था व चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस हेल्पलाइन नंबर वर तात्काळ संपर्क करून पोलीस स्टेशनला त्याची माहिती द्यावी. त्यामुळे चोरीच्या घटनांना आळा बसू शकतो असे ते म्हणाले .

फार्मसी संघटनेचे बाबाजी गलांडे म्हणाले की वेगाने गाडी चालवणे जोरात हॉर्न वाजविणे यावर पोलीसांनी कारवाई करावी.सामाजिक कार्यकर्ते नितीन थोरात म्हणाले की बिगर नंबर प्लेट मोटारसायकल गाडी फिरवणारे व चारचाकी गाड्याच्या काळा काचा असणारांवर वर कारवाई करावी . माजी सरपंच प्रकाश थोरात म्हणाले की शिरुर जवळ एमआयडीसी असून मोठ्या संख्येने परप्रांतीय येत असतात.त्यांची नोंद ठेवावी .जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर म्हणाले की शहरातील पार्किंगचा प्रश्न नगरपालिकेच्या मदतीने सोडवावा .सराफ संघाचे माजी उपनगराध्यक्ष नेमीचंद फुलफगर म्हणाले की दररोज संध्याकाळी शिरुर शहरातील राम आळी ते डंबेनाला परिसरातील दुकाने बंद करण्याचा वेळी सायंकाळी साडे सहा ते साडे आठचा दरम्यान पोलीसांची गस्त ठेवावी.नागरिकांच्या मदतीसाठी असणारा ११२ कॉल डायल चा अनुभव फारसा सकारात्मक नसल्याचे आम आदमी पक्षाचे ॲड . सुभाष जैन म्हणाले .नितीन बारवकर ,अभिजीत आंबेकर , मुकुंद ढोबळे , अनिल डांगे यांनी विविध सूचना मांडल्या .

बैठकीस आखिल भारतीय मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे ,आदित्य पतसंस्थेचे अध्यक्ष विनोद धाडीवाल , जैन युवा परिषदेचे प्रकाश बाफना , शिरुर राष्ट्रवादी कॉग्रेस चे अध्यक्ष शरद कालेवार ,समस्त सकल मराठा समाज संघचे विश्वस्त सागर नरवडे , आदी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी केले .

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At shirur deputy superintendent of police prashant dhole stated about village security and police efficiency pune print news asj