पुण्यातील खडकी परिसरात शाळकरी मुलीला आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी खडकी पोलिसांनी एका तरुणास अटक केली. प्रणय अशोक माने (वय १८, रा. नाझरवाडा, खडकी बाजार) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- VIDEO : ना रस्ता, ना रुग्णवाहिका! उपचारासाठी ५५ वर्षीय महिलेचा सहा किलोमीटर झोळीतून प्रवास

आरोपीस अटक

आरोपी मानेशी शाळकरी मुलीची वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. मानेने तिला आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाली. या घटनेची माहिती कोणाला दिल्यास कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मानेने मुलीला दिली. त्यानंतर घाबरलेल्या मुलीने पोलिसांकडे तक्रार दिली. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा तसेच बलात्कार केल्या प्रकरणी मानेला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक मगदूम तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man arrested for raping school girl pune print news dpj