Premium

पोलीस भरतीच्या ठिकाणी मुलीला सोडून येताना भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत वडीलांचा जागीच मृत्यू

रस्ता ओलांडताना भरधाव वाहनांने दिलेल्या धडकेत वडीलांचा जागीच मृत्यू

accident in thane
कल्याणमध्ये दुचाकीच्या धडकेत महिला डाॅक्टर गंभीर जखमी (फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र, लोकसत्ता)

पुणे प्रतिनिधी: राज्यातील अनेक भागातून पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ग्राऊंड येथे मागील महिन्याभरापासून पोलिस भरती करीता तरुण आणि तरुणी येत आहे. त्याच दरम्यान आज पोलीस भरतीच्या ठिकाणी मुलीला सोडून चहा पिण्यास रस्ता ओलांडताना भरधाव वाहनांने दिलेल्या धडकेत वडीलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मयत सुरेश सखाराम गवळी ५५ वर्षांचे आणि मूळचे नाशिक येथील राहणारे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथील सुरेश सखाराम गवळी हे रिक्षा चालक असून पत्नी आणि २२ वर्षीय मुलीला घेऊन ते काल रात्री १० वाजता पुण्यात आले होते. आज त्यांच्या मुलीचे ग्राऊंड होते. पुण्यात त्यांचे नातेवाईक नसल्याने शिवाजीनगर मुख्यालयाच्या बाहेरील फुटपाथवर रात्री ते कुटुंबीय झोपले. त्यानंतर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी मुलीला ग्राऊंडच्या गेटवर सोडले. त्यानंतर सखाराम गवळी हे पत्नीला म्हणाले की, मी चहा पिऊन येतो. तेथून काही अंतर पायी चालत गेल्यावर रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनांने सखाराम यांना जोरात धडक दिली.तेथून काही अंतरावर सखाराम गवळी यांची पत्नी देखील होती.

आणखी वाचा- पुणे: ज्येष्ठ महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकून ८० हजारांचे दागिने हिसकावले

सर्व लोक घटनेच्या ठिकाणी जमलेले पाहून त्या नेमक काय झाल आहे. हे पाहण्यासाठी गेल्यावर सखाराम गवळी यांच्या पत्नी रेश्मा यांना त्याच्या पतीचा अपघात झाल्याच दिसून आले.सखाराम हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील उपनिरीक्षक अर्जुन नाईकवाडे यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 12:09 IST
Next Story
पुणे: ज्येष्ठ महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकून ८० हजारांचे दागिने हिसकावले