गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश मारणेला गुन्हे शाखेने संगमनेर परिसरातून बुधवारी सायंकाळी ताब्यात घेतले. मारणे पसार झाल्यानंतर त्याचा गुन्हे शाखेकडून शोध घेण्यात येत होता. मोहोळचा खून ५ जानेवारी रोजी कोथरुडमधील सुतारदरा परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> हवाई प्रवाशांचे हाल संपेनात! पुणे विमानतळावर रोजचा गोंधळ सुरूच; अनेक विमाने रद्द

याप्रकरणात मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार, साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याच्यासह १६ जणांना अटक करण्यात आली होती. मोहोळवर गोळ्या झाडणाऱ्या आरोपींनी आम्ही गणेश मारणे टोळीतील आहोत, असा आरडाओरडा केला होता. मारणे याने खून प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मारणे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सरकार पक्षाला बाजू मांडण्याचे आदेश न्यायालयाने नुकतेच दिले.  मारणे पसार झाल्यानंतर गुन्हे शाखेची पथके त्याच्या मागावर होते. संगमनेर परिसरातून बुधवारी सायंकाळी मारणेसह तिघांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. गु्न्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mastermind ganesh marne arrested in sharad mohol murder case pune print news rbk 25 zws