शिवाजीनगर गावठाण परिसरात दहशत माजविणाऱ्या गुंड शेरु परदेशी आणि साथीदारांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणी श्रीनाथ उर्फ शेरु परदेशी, रणजीत परदेशी, चिराग जोशी, अथर्व देशपांडे (सर्व रा. शिवाजीनगर गावठाण) यांच्यासह प्रवीण शेळके आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. परदेशी आणि साथीदारांनी जंगली महाराज रस्त्यावरील एका मोबाइल शाॅपी चालकाला शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागितली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. आरोपींनी मोबाइल शॉपी चालकाकडून सहा लाखांसाठी ३५ लाख रुपये व्याज उकळले होते. परदेशी आणि साथीदार कारागृहात होते. त्या वेळी त्यांना जामीन मिळावा म्हणून देशपांडे आणि साथीदारांनी मोबाइल शॉपी चालकाकडे खंडणी मागितली होती.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम गौड, सहायक निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, राहुल होळकर, गणपत वाळकोळी, दिलीप नागरे यांनी मोक्का कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावास अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे आणि पोलीस आयुक्त डाॅ. प्रियंका नारनवरे यांनी मंजुरी दिली. सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mokka for the sheru perdesi gang terrorizing shivajinagar village pune print news amy