पुणे : पुणे विमानतळावरील समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे हवाई प्रवास अडथळ्यांची शर्यत बनू लागला आहे. अनेक विमानांच्या उड्डाणांना होणारा विलंब मोठी डोकेदुखी ठरू लागला आहे. त्यातच विमान कंपन्यांच्या विरोधातील प्रवाशांच्या तक्रारीही वाढू लागल्या आहेत. पुणे विमानतळावर सध्या येणारी आणि जाणारी मिळून १८२ विमाने आहेत. विमानतळावरील गर्दी वाढत असल्याने तेथील सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. यासाठी नवीन टर्मिनलची उभारणी करण्यात आली. मात्र, उद्घाटनाला महिना उलटूनही ते सुरू झालेले नाही. सध्या उन्हाळी सुट्यांमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. विमानतळावर सुरक्षा तपासणी करण्यास विलंब होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून सातत्याने केली जात आहे. यावर विमानतळ प्रशासन आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. याचवेळी डिजियात्राची सक्ती केली जात असल्याची तक्रार प्रवासी सातत्याने करीत आहेत.
पुणेकरांचा हवाई प्रवास ठरतोय ‘वाऱ्यावरची वरात’!
विमानतळावर सुरक्षा तपासणी करण्यास विलंब होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून सातत्याने केली जात आहे.
Written by लोकसत्ता टीम
पुणे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-04-2024 at 12:56 IST
TOPICSपुणेPuneपुणे न्यूजPune Newsप्रवासीPassengerमराठी बातम्याMarathi NewsविमानविमानतळAirport
+ 2 More
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers suffer at pune airport due to inadequate facilities flight late and crowd pune print news stj 05 css