दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई

काश्मिरमधील दहशतवादी संघटनांनी संबंधित तरुणाला पैसे पुरवल्याचा संशय आहे.

Pune ATS
काश्मिरमधून पैसे पुरवण्यात आल्याचा संशय (फाइल फोटो)

पुणे दहशतवादी विरोधी पथकाने जुनेद मोहोम्मद नावाच्या या तरुणाला दापोडी परिसरातून अटक केली आहे. काश्मिरमधील दहशतवादी संघटनांनी संबंधित तरुणाला पैसे पुरवल्याचा संशय आहे. पुणे एटीएसचे पथक आणखी चौकशी करत असून अटक केलेल्या तरुणाला थोड्याच वेळेत शिवाजीनगर इथल्या न्यायालयात हजर करणार आहे.

जुनेदच्या बँक खात्यात दहा हजार रुपये हे ‘गजवाये हिंद’ या संघटनेने ट्रान्सफर केल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिलीय. जुनेदला पुण्यातील कोर्टात आज हजर करण्यात येणार आहे. त्यानंतरच या प्रकरणासंदर्भाती अधिक माहिती समोर येईल असं सांगण्यात आलंय.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune ats arrested one in suspected connection with kashmiri terrorists kjp scsg

Next Story
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या कामाला खेड तालुक्यात अडथळा; संरक्षण विभागाचा आक्षेप
फोटो गॅलरी