Not Jio Airtel, but 'this' company offering high speed data, free Disney+ Hotstar and more at just Rs 151 | Loksatta

Jio, Airtel नाही, तर ‘ही’ कंपनी देतेय फक्त १५१ रुपयांमध्ये हायस्पीड डेटा, फ्री Disney+ Hotstar आणि बरंच काही…; जाणून घ्या

एका टेरिफ प्लॅनमध्ये फ्री डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन, हाय-स्पीड डेटा आणि इतर अनेक फायदे केवळ १५१ रुपयांमध्ये दिले जात आहेत.

Jio, Airtel नाही, तर ‘ही’ कंपनी देतेय फक्त १५१ रुपयांमध्ये हायस्पीड डेटा, फ्री Disney+ Hotstar आणि बरंच काही…; जाणून घ्या
एका टेरिफ प्लॅनमध्ये फ्री डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन, हाय-स्पीड डेटा आणि इतर अनेक फायदे केवळ १५१ रुपयांमध्ये दिले जात आहेत. (Indian Express)

सिनेमासोबतच ओटीटी कंटेंटच्या फॅन फॉलोइंगमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे, परंतु या कंटेंटचा आनंद घेण्यासाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मची मेंबरशिप घ्यावी लागते आणि त्यासाठी भरमसाठ पैसेही खर्च करायला लागतात. काहींची किंमत कमी असली तरी, सर्व प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन घेणे अनेकांसाठी महाग होते.

जर तुम्ही या कारणामुळे ओटीटी सबस्क्रिप्शन घेऊ शकत नसाल तर असा एक टेरिफ प्लॅन आहे, ज्यामध्ये फ्री डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन, हाय-स्पीड डेटा आणि इतर अनेक फायदे केवळ १५१ रुपयांमध्ये दिले जात आहेत. चला जाणून घेऊया या प्लॅनबद्दल.

हा जिओ किंवा एअरटेलचा प्लॅन नाही तर वोडाफोन आयडिया हा रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे. या प्लॅनची किंमत केवळ १५१ रुपये असून यामध्ये हायस्पीड डेटासह इतर अनेक फायदे दिले जात आहेत. यामध्ये डिस्ने + हॉटस्टार मोबाइलच्या सबस्क्रिप्शनची वैधता तीन महिन्यांची आहे.

तुमच्या मोबाईलला किती रेंज मिळते? जाणून घेण्यासाठी मोबाईलमध्येच आहे ‘हा’ पर्याय

मोफत ओटीटी सबस्क्रिप्शन व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये आणखी अनेक फायदे आहेत. ३० दिवसांच्या वैधतेसह या प्लानमध्ये एकूण ८ जीबी इंटरनेट दिले जात आहे. या प्लानमध्ये यूजर्सना फ्री एसएमएस किंवा अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात नाही. असे म्हणता येईल की हा प्लान फक्त एक चांगला ओटीटी प्लान आहे जो सबस्क्रिप्शन आणि डेटा देत आहे. व्हीआयचा ३९९ रुपयांचा प्लॅनदेखील डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शनसह येतो, जो दैनंदिन डेटा, मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग देखील ऑफर करतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
तुम्हालाही फेसबूकवर सतत अनावश्यक पोस्ट दिसतात का? ही ट्रिक वापरून मिळवा सुटका

संबंधित बातम्या

विश्लेषण: AIIMS चा सर्व्हर हॅक करून मागितली २०० कोटींची खंडणी, रॅन्समवेअर कुणावरही करू शकतो हल्ला! कसा कराल बचाव?
जिओचे २०० रुपयांखालील प्लान्स पाहिलेत का? UNLIMITED CALLS, इंटरनेटसह मिळतंय बरच काही, पाहा यादी
प्रतीक्षा संपली! ५० MP कॅमेरा असलेला Tecno Spark 9T भारतात लॉंच, किंमत १० हजारांपेक्षा कमी
चिंताजनक: 9-10 वर्षांची मुलं अडकतायत सोशल मीडिया व ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात, कारण माहितेय का?
४८,४९९ रुपयांत मिळवू शकता APPLE IPHONE 13, केवळ ‘हे’ करा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
नाद कुणाचा करायचा! टायगर शार्कचा व्हिडीओ काढायला गेला अन् होत्याचं नव्हतं झालं, पाण्यातील थरारक Viral Video पाहाच
मधुमेहाच्या रुग्णांनी रोज ‘हे’ पदार्थ खाण्यास सुरुवात करा; रक्तातील साखरेची समस्या कायमची दूर होईल
या चित्रात असलेली चुक तुम्हाला दिसली का? तीक्ष्ण नजर असणाऱ्यांना पटकन येईल ओळखता
पुण्यातील तरुणाचा भन्नाट प्रयोग; चक्क कंटेनरमध्ये घेतले काश्मिरी ‘केशर’चे पीक
मालवणी जेवण, ठेचा- बाकरवडी अन्… ‘चला हवा येऊ द्या’मध्ये विकी कौशलची थेट मराठीत डायलॉगबाजी