Jio 5G असणार 4G पेक्षाही स्वस्त? जाणून घ्या, नव्या Tariff Planची अपेक्षित किंमत

५जी लिलाव संपला आहे आणि सर्वजण ५जी नेटवर्क सेवा रोलआउट होण्याची वाट पाहत आहेत.

Jio 5G असणार 4G पेक्षाही स्वस्त? जाणून घ्या, नव्या Tariff Planची अपेक्षित किंमत
५जी लिलावात जिओचे वर्चस्व राहिले. (Financial Express)

भारतात लवकरच ५जी सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही १५ ऑगस्टच्या भाषणात याचा उल्लेख केला आहे आणि लवकरच ५जी सेवा सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. ५जी लिलाव संपला आहे आणि सर्वजण ५जी नेटवर्क सेवा रोलआउट होण्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, या लिलावात जिओचे वर्चस्व राहिले. जिओने सर्वोच्च ५जी स्पेक्ट्रम विकत घेतला आहे. तुम्हीसुद्धा जिओच्या ५जी रोलआउट प्लॅनबद्दल विचार करत आहात का? तर आज आपण जिओ ५जी इंडियाची लॉंच तारीख, त्याचा ५जी बँड सपोर्ट, जिओ ५जी लाँच होणार असलेल्या शहरांची यादी आणि ५जी प्लॅनची अपेक्षित किंमत जाणून घेणार आहोत.

दूरसंचार विभागाने आयोजित केलेल्या ५जी लिलावात, जिओने ८८,०७८ कोटी रुपयांना २४.७GHz स्पेक्ट्रम मिळवले. यामुळे जिओ सर्वाधिक बोली लावणारी कंपनी ठरली असून तिच्याकडे संपूर्ण भारतातील सर्वात मोठा स्पेक्ट्रम (२६.७७ GHz) आहे. रिलायन्स जिओने ७००MHz (n२८), ८००MHz (n५), १८००MHz (n३), ३३००MHz (n७८), आणि प्रीमियम एमएमवेव्ह २६GHz (n२५८) या सर्व लोकप्रिय फ्रिक्वेन्सी बँडमध्ये ५जी बँड खरेदी केले आहेत. येथे, ७०० MHz बँड हा सर्वाधिक मागणी असलेला बँड आहे, कारण तो जिओला भारतातील ग्रामीण भागात प्रवेश करू देईल आणि जनतेला कमी किमतीची ५जी सेवा प्रदान करेल.

iPhone vs Android : आयफोन आणि अँड्रॉइड फोनच्या किंमतीत इतकी तफावत का? जाणून घ्या यामागची कारणे

जिओने अद्याप आपल्या ५जी सेवेच्या लॉंच तारखेची औपचारिक घोषणा केलेली नाही. परंतु अलीकडेच, रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले की कंपनी संपूर्ण भारत ५जी रोलआउटसह ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करेल. १५ ऑगस्टपासून सेवा सुरू झालेली नसली तरीही लॉंचची तारीख अगदी जवळ आली आहे.

जिओने सर्व २२ मंडळांसाठी ५जी बँड विकत घेतले आहेत, त्यामुळे जिओ ५जी भारतातील सर्व क्षेत्रांमध्ये येत आहे. तथापि, एका अहवालानुसार, कंपनीची ५जी सेवा सुरुवातीला दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई, लखनऊ, हैदराबाद, अहमदाबाद आणि जामनगर या नऊ शहरांमध्ये सुरू होईल.

जिओने आठ शहरांमध्ये ५जी चाचण्या घेतल्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रमाणात ५जीचा वेग पाहिला आहे. ९१मोबाईल्स (91Mobiles) च्या अलीकडील अहवालात असे दिसून आले आहे की जिओच्या मुंबईतील ५जी चाचणीमध्ये डाउनलोडची गती ४जीच्या ​​बँडविड्थपेक्षा आठ पट अधिक पाहायला मिळाली. असे दिसते की जिओ ५जी अपलोड गतीमध्ये ४२०Mbps आणि ४१२ Mbps पर्यंत डाउनलोड गती आणू शकते, जे भारतातील ४जी स्पीडपेक्षा एक मोठे अपग्रेड आहे.

Photos : WhatsApp वर चॅट करणे होणार आणखीनच सुरक्षित; नव्या फीचरमुळे युजर्स खुश

जिओचा ५जी प्लॅन आणि भारतात किंमत काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, रिलायन्स जिओच्या स्पर्धात्मक पद्धतींबद्दल प्रत्येकालाच चांगली माहिती आहे, म्हणून अशी अपेक्षा केली जात आहे की जिओच्या ५जी प्लॅनची ​​किंमत ४०० ते ५०० रुपये प्रति महिना असेल. सध्या जिओचा प्रति युनिट सरासरी महसूल (ARPU) सुमारे १७५ रुपये आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Will jio 5g be cheaper than 4g know the expected price of the new tariff plan pvp

Next Story
नवीन स्मार्टफोनसाठी पैसे खर्च का करता? जुन्याच फोनच्या सेटिंग्ज बदला, आणि फोन नव्यासारखा बनवा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी