विमानतळावरील कन्व्हेयर बेल्टवर पेपरमध्ये गुंडाळलेला मृतदेह?; Viral Video पाहून नेटकरी हैराण

नुकतेच विमानतळाच्या कन्व्हेयर बेल्टवर असे दृश्य पाहायला मिळाले जे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

A corpse wrapped in paper on an airport conveyor belt
जोपर्यंत तुम्हाला व्हिडीओचे सत्य कळत नाही तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडीओ भयानक वाटेल. (Photo : Instagram/@viralhog)

तुम्ही कधी विमानतळावर गेला असाल तर कन्व्हेयर बेल्ट पाहिला असेल. विमानतळाच्या आत असलेले हे बेल्ट एक मशीन आहे ज्यावर प्रवाशांना त्यांचे सामान मिळते. विमान उतरल्यानंतर, सामान बाहेर काढून बेल्टवर ठेवले जाते आणि ते हळूहळू फिरते. ज्याला त्याचे सामान दिसले, तो ते उचलतो आणि निघून जातो. पण नुकतेच विमानतळाच्या कन्व्हेयर बेल्टवर असे दृश्य पाहायला मिळाले जे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

आपल्या आगळ्यावेगळ्या व्हिडीओसाठी प्रसिद्ध असलेल्या व्हायरल हॉगवर या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक भयानक आणि तितकाच मजेदार व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जोपर्यंत तुम्हाला व्हिडीओचे सत्य कळत नाही तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडीओ भयानक वाटेल. मात्र जेव्हा तुम्हाला सत्य समजेल तेव्हा तुम्ही नक्कीच हसाल.

लग्नाचा मेकअप करतानाच गाढ झोपी गेली नववधू; Video सोशल मीडियावर व्हायरल

हायवेवरच्या फलकाला लटकून केली Exercise; Viral Video पाहून नेटकरी झाले हैराण

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो, विमानतळाच्या आत कन्व्हेयर बेल्टवर फॉइल आणि टेप मध्ये गुंडाळलेले ‘प्रेत’ फिरताना दिसत आहे. लोक त्याच्याकडे टक लावून पाहत आहेत. कन्व्हेयर बेल्टवरील सामानाव्यतिरिक्त असा प्रकार पाहून आश्चर्य वाटते. त्या ‘प्रेता’चे सत्य अनेकांना माहीत असल्यासारखे वाटते. मात्र, व्हिडीओमध्ये दिसणारी ही गोष्ट नेमकी काय आहे हे आपण आता जाणून घेऊया. हे कोणतेही प्रेत नाही, तर कपड्याच्या दुकानात ठेवला जाणारा पुतळा आहे.

अजय देवगण स्टाइलने स्टंट करणे पडले महागात; पोलिसांनी अशी घडवली अद्दल

या व्हिडीओला ८८ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने सांगितले की, जे लोक विचारत आहेत की तेथे उपस्थित प्रवाशांना पुतळा पाहून आश्चर्य का वाटले नाही, की विमानतळाच्या आत कोणतेही सामान आले तर ते बॅगेज सुरक्षा तपासणीद्वारेच येते हे प्रवाशांना माहित असते.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A corpse wrapped in paper on an airport conveyor belt netizens annoyed by watching viral video pvp

Next Story
लग्नाचा मेकअप करतानाच गाढ झोपी गेली नववधू; Video सोशल मीडियावर व्हायरल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी