Appacha Vishay Lay Hard Hai Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी हजारो लोक वेगवेगळ्या विषयांवर रिल्स बनवतात. कधी कधी सोशल मीडियावर एखादे गाणे चांगलेच व्हायरल होते आणि त्या ट्रेंडिंग गाण्यावर लोक आवडीने व्हिडीओ बनवताना दिसून येतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या असंच एक गाणं चर्चेत आलं आहे. “आप्पाचा विषय लय हार्ड हे” हे गाणं तुम्हीही ऐकलं असेल. सध्या या गाण्यावर लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण मजेशीर रिल बनवताना दिसताहेत. सध्या हे गाणं चांगलेच व्हायरल होत आहे. (Appacha Vishay Lay Hard Hai trending song reels viral on social media do you know who wrote and sing this song)

व्हायरल रिल्स (Viral Reels on Instagram)

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती दिसेल. त्यांनी एटीएममधून पैसे काढले आहे आणि ते पैसे मोजताना दिसत आहे. या व्हिडीओवर “आप्पाचा विषय लय हार्ड हे” हे गाणं लावलं आहे.

हेही वाचा : bangladesh crisis : शेख हसीनांच्या राजीनाम्यानंतर भारतीय लष्कर बांगलादेश विमानतळावर दाखल? Video नेमका कधीचा? अखेर सत्य आलं समोर

या व्हिडीओमध्ये वृद्ध काका काकू दिसत आहे. काकूने छत्री पकडली आहे आणि काका नेत्याप्रमाणे वागताना दिसत आहे आणि तरुण मुलगा हे गाणं गाताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये एक तरुणी एका चिमुकल्याबरोबर या गाण्यावर रिल बनवताना दिसते.
https://www.instagram.com/reel/C-R35GqNrxW/

या व्हिडीओमध्ये एक शेतकरी तरुण शेतामध्ये या गाण्यावर रिल बनवता दिसत आहे.

व्हायरल गाणं ( Viral Song – Appacha Vishay Lay Hard Hai)

“आप्पाचा विषय लय हार्ड हे.
आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड हे
आप्पाचं घरात नाय ध्यान पण
आप्पाचा बाहेर लय लाड आहे..”

हेही वाचा : ईssss…! मद्यधुंद तरुण रस्त्यातील चिखलात लोळला अन् नंतर केले असे काही की, video पाहून तुम्हालाही येईल किळस

सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, हे गाणं कुणी लिहिले आणि कुणी गायले? युट्युबवर वरदान या नावाने अकाउंट असलेल्या एका तरुणाने हे गाणं गायलं आहे आणि त्यानेच हे गाणं लिहिले सुद्धा आहे.

इन्स्टाग्रामवर या गाण्याच्या असंख्य रिल्स लोकांनी बनवल्या आहेत. प्रत्येक रिल्सवर लाखो व्ह्यूज असून युजर्सच्या पसंतीस हे गाणं उतरले आहे. युजर्स प्रत्येक व्हिडीओवर लाइक आणि कमेंट्चा वर्षाव करताना दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appacha vishay lay hard hai trending song reels viral on social media do you know who wrote and sing this song ndj