Elephant Viral Video: हत्तीला अतिशय शांत आणि बलाढ्य प्राणी म्हणून ओळखलं जातं. हे हत्ती खूप दयाळूही असतात आणि अनेकदा ते गरजू प्राण्यांना मदत करतानाही दिसतात. प्राणी जरी बोलू शकत नसले तरी नातेसंबंध कसे टिकवायचे हे ते माणसांपेक्षा कितीतरी पटीने चांगले समजतात. हत्ती हा नेहमीच कळपात फिरणारा प्राणी आहे. अनेक वेळा अशा घटना घडतात, ज्या एखाद्या व्यक्तीसोबत घडल्या तर तो अत्यंत अस्वस्थ होतो. पण अलीकडच्या प्रकरणात हत्तींनी ज्या शहाणपणाने परिस्थिती हाताळली ते खरोखरच आश्चर्यकारक आहे. असाच एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हत्तीचं कौतुक करत आहेत. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?

हत्तीचं पिल्लू पाण्यामध्ये पडल्यानंतर इतर हत्तींची कशी अवस्था झाली आहे. त्याचबरोबर त्याला वाचण्यासाठी हत्ती कशी धाव घेतात, हे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला असून लोकांनी त्यावर विविध प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. कौटुंबिक एकतेच्या या हृदयस्पर्शी क्लिपमध्ये, दक्षिण आफ्रिकेच्या अड्डो एलिफंट नॅशनल पार्कमध्ये एक हत्तीचं छोटं पिल्लू खेळता खेळता चिखलाने भरलेल्या तलावात पडतं. त्यावेळी आजूबाजूला असलेला हत्तींचा कळप त्याला वाचवण्यासाठी धाव घेतात. ज्यावेळी ते हत्तीचं पिल्लू जीव वाचवण्यासाठी तडफडू लागतं. त्यावेळी सर्व हत्ती एकत्र येऊन त्याला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न करताना या व्हिडिओमध्ये दिसतात.

(हे ही वाचा : मासे पकडण्यासाठी मुलाने शोधला भन्नाट जुगाड; प्लास्टिकच्या बाटल्यांचा असा केला वापर, पाहा VIDEO)

हा व्हिडिओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला लोक खूप पसंत करत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हत्तीचे बाळ खेळता खेळता चिखल असलेल्या तलावात बुडत आहे. पण यानंतर, आपले शौर्य आणि प्रेम दाखवून, कळपातील सर्व हत्ती एकत्र येतात आणि त्याला बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. हत्तींच्या कळपाने या पिल्लाला ज्या पद्धतीने वाचवले त्याची सध्या बरीच चर्चा होत आहे.

येथे पाहा व्हिडिओ

येथे पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडीओमध्ये, प्रौढ हत्ती बाळाला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. प्रथम ते त्यांच्या सोंडेने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर एक हत्ती पाण्यात जातो आणि तिथून पिल्लाला ढकलून देतो आणि नंतर त्याला तिथून बाहेर काढतो. त्याला, सर्व हत्ती आधार देण्यासाठी उभे असतात. पाण्याच्या खड्ड्यातून जेव्हा लहान हत्तीचा पिल्लू बाहेर येतो, तेव्हा सर्व हत्तीच्या कळपाने सुटकेचा नि:श्वास सोडला आणि हीच खरी माणूसकी दाखवली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elephant herd comes together to save calf stranded in mud video viral pdb